Indian Money Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8 वा वेतन आयोग होणार लागू!

8th Pay Commission latest Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी देशभर लागू असून कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

8th Pay Commission latest Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी देशभर लागू असून कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळत आहे.

मात्र, त्यांना शिफारस केलेल्यापेक्षा कमी पगार मिळत असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. याबाबतचे निवेदन तयार करत असून ते लवकरच शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.

या निवेदनातील शिफारशींनुसार पगार वाढवण्याची किंवा 8 वा वेतन आयोग आणण्याची मागणी केली जाणार आहे. दुसरीकडे, सरकारने सभागृहात 8 वा वेतन रक्कम लागू करण्याच्या विषयावर अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

किमान वेतन 26 हजार रुपयांपर्यंत असू शकते

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Employees) संघटनांचे म्हणणे आहे की, सध्या किमान वेतन मर्यादा 18 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टरला इन्क्रीमेंटमध्ये खूप महत्त्व देण्यात आले आहे. सध्या हा घटक 2.57 पट आहे, मात्र 7 व्या वेतन आयोगात तो 3.68 पट ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरुन 26 हजार रुपये होईल.

सरकार नवीन प्रणाली देखील सुरु करु शकते

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता 7 व्या वेतन आयोगानंतर नवीन वेतन आयोग येणार नाही. त्याऐवजी सरकार अशी यंत्रणा राबवणार आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आपोआप वाढ होईल. ही एक 'ऑटोमॅटिक पे रिविजन सिस्टम' असू शकते, ज्यामध्ये डीए 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास, पगारात ऑटोमॅटिक सुधारणा होईल. असे झाल्यास 68 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 52 लाख पेन्शनधारकांना त्याचा थेट लाभ मिळेल. मात्र, सरकारने याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. याबाबत निर्णय घेतल्यानंतर सरकार (Government) अधिसूचना जारी करुन अधिकृत निर्णय जाहीर करेल.

कमी उत्पन्न गटासाठी पगार अधिक वाढू शकतो

या प्रकरणाशी संबंधित अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महागाई (Inflation) पाहता मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांचा पगार वाढला पाहिजे. अशा परिस्थितीत सरकारने 2023 मध्ये वेतनाचा नवा फॉर्म्युला आणला तर कमी उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांना चांगला लाभ मिळू शकतो. त्यांचा मूळ पगार 3 हजार ते 21 हजार रुपयांनी वाढू शकतो.

युनियन सरकारला निवेदन देणार

सेंट्रल एम्प्लॉईज युनियनच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पगारवाढीच्या मागण्यांबाबत युनियन लवकरच एक नोट तयार करुन सरकारला सुपूर्द करणार आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास संघटनेला तीव्र आंदोलन करावे लागेल. या आंदोलनात कर्मचाऱ्यांसह पेन्शन मिळालेले कर्मचारीही सहभागी होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT