7th Pay Commission
7th Pay Commission   Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट, DA नंतर आता वाढणार हा भत्ता!

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळणार आहे. सरकारने डीएमध्ये वाढ केली असून, यासोबतच आता आणखी भत्ता वाढविण्याचा विचार केला जात आहे. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डीए वाढीसोबत एचआरए वाढीचीही घोषणा केली जाऊ शकते. वास्तविक, डीए वाढीसह, एचआरएमध्ये सुधारणा देखील अपेक्षित आहे.

38% DA असू शकते

केंद्र सरकारचे (Central Government) कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच या महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळणार आहे. यासोबतच एचआरएमध्ये वाढ करण्याची घोषणाही लवकरच केली जाऊ शकते. यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये एचआरएमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर डीए (DA) देखील 28 टक्के करण्यात आला. आता डीए 38 टक्के झाला आहे, तर एचआरएमध्येही सुधारणा करता येईल.

HRA कसा निर्धारित केला जातो

आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Employees) HRA कसा ठरवला जातो ते पाहू. ज्या शहरांची लोकसंख्या 50 लाखांपेक्षा जास्त आहे ती 'X' श्रेणीत येतात. त्याचबरोबर ज्यांची लोकसंख्या 5 लाखांपेक्षा जास्त आहे, ते ‘Y’ श्रेणीत येतात. आणि 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरे 'Z' श्रेणीत येतात. तिन्ही श्रेणींसाठी किमान एचआरए 5400, 3600 आणि 1800 रुपये असेल.

HRA किती वाढू शकतो

त्यानुसार, कर्मचार्‍यांचा एचआरए ते काम करत असलेल्या शहराच्या श्रेणीनुसार निर्धारित केला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, X श्रेणीतील शहरांमध्ये राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा HRA DA प्रमाणेच 4 ते 5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या या शहरांतील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 27 टक्के एचआरए मिळतो.

त्याच वेळी, Y श्रेणीतील शहरांसाठी एचआरएमध्ये 2 टक्के वाढ शक्य आहे. सध्या या कर्मचाऱ्यांना 18 ते 20 टक्के एचआरए मिळतो. त्याचवेळी Z श्रेणीतील शहरांसाठी 1 टक्के एचआरए वाढवता येऊ शकतो. त्यांना सध्या 9-10 टक्के दराने HRA दिला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

Goa Today's Live News: कॅथलिक विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी - चर्चिल आलेमाव

Sam Pitroda: ‘’भारतात पूर्वेकडील लोक चिनी तर दक्षिणकेडील लोक...’’ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा पुन्हा बरळले

Lok Sabha Election 2024: मतदान करतानाचा फोटो काढताना फातोर्डा येथे महिलेला पकडले; चौकशीअंती सुटका

Watch Video: पाकिस्तानमधील टार्गेट किलिंगमध्ये भारताचा हात; पाक लष्करी अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT