Money DaINIK Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट, DA नंतर DR मध्ये 4 टक्के वाढ

7th Pay Commission DR Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. यापूर्वी सरकारने महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के केला होता. आता सरकारने 1 जुलै 2022 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई रिलीफ (DR) मध्ये 4% वाढ केली आहे. निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार (OM) आता DR 38% करण्यात आला आहे.

मेमोरँडममध्ये काय माहिती आहे

8 ऑक्टोबर 2022 रोजी विभागाने जारी केलेल्या मेमोरँडममध्ये म्हटले की, 'केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारक/कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना ग्राह्य असलेली महागाई सवलत 01.07.2022 पासून सध्याच्या 34% वरुन 38% पर्यंत वाढवली जाईल.'

दरम्यान, DR मधील वाढीमुळे केंद्र सरकारचे कर्मचारी, केंद्र सरकारचे निवृत्तीवेतनधारक आणि केंद्र सरकारकडून (Central Government) निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना फायदा होईल. DR साधारणपणे वर्षातून दोनदा सप्टेंबर आणि मार्च महिन्यात घोषित केला जातो. एवढेच नाही तर पेन्शनर पोर्टलनुसार, 'जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील पेन्शन/कौटुंबिक पेन्शनवरील डीआर मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यासाठी उपलब्ध असलेल्या डीआर दरांनुसार मोजले जातील.

1 जुलै 2022 पासून महागाई भत्ता वाढीची अंमलबजावणी होणार

1 जुलै 2022 पासून सरकारकडून डीएमध्ये वाढ लागू होईल. यापूर्वी मार्च 2022 मध्ये सरकारने जानेवारीपासून डीए (महागाई भत्ता) वाढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 31 टक्क्यांवरुन 34 टक्के करण्यात आला होता. आता तो 38 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना (Employees) सप्टेंबर महिन्याच्या पगारात दोन महिन्यांची डीएची थकबाकी मिळणार आहे.

या आधारावर डीए वाढतो

केंद्र सरकार AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) इंडेक्सचा डेटा लाखो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीचा आधार मानते. पहिल्या सहामाहीतील AICPI-IW डेटाच्या आधारे जुलैचा DA जाहीर करण्यात आला. जूनमध्ये निर्देशांक 129.2 पर्यंत वाढल्याने, डीए (DA) 4 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा मार्ग मोकळा झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT