Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, DA मध्ये झाली वाढ; 90,000 रुपये मिळणार!

7th Pay Commission Latest Update: तुम्हीही वाढलेल्या पगाराची वाट पाहत असाल तर तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission DA Hike: होळीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. तुम्हीही वाढलेल्या पगाराची वाट पाहत असाल तर तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे.

केंद्र सरकारने लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी बातमी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्क्यांवरुन 42 टक्के झाला आहे. सध्या तरी त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

पगार किती वाढू शकतो?

7व्या वेतन आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ झाल्यानंतर, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 30,000 रुपये असेल तर त्याच्या एकूण पगारात सुमारे 10,800 रुपयांची वाढ होऊ शकते.

दुसरीकडे, जर आपण सचिव स्तराबद्दल बोललो, तर कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारात 90,000 रुपये किंवा त्याहूनही अधिक वाढ होऊ शकते.

पेन्शनही वाढेल

यासोबतच डीआरमध्ये वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या (Employees) पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. पेन्शनधारकांचा डीआर 42 टक्के असेल तर या लोकांना दरमहा 14868 रुपये मिळतील. हा लाभ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

2 महिन्यांचे पैसे थकबाकी म्हणून दिले जातील

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाढलेला महागाई भत्ता मार्चच्या पगारात दिला जाईल. यासोबतच कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे वेतन थकबाकी म्हणून मिळणार आहे.

जर तुमचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर त्यानुसार तुमचा DA दरमहा 720 रुपयांनी वाढेल. दुसरीकडे, जेव्हा तुम्हाला 2 महिन्यांचे पैसे थकबाकी म्हणून मिळतील, तेव्हा तुमच्या खात्यात आणखी 1440 रुपये येतील.

महागाईनुसार डीए वाढतो

कामगार मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, DA ची गणना ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारे केली जाते. देशात महागाई कशी वाढत आहे? त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. सध्या जानेवारी महिन्यात सरकारने (Government) महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beach: "भज मन राधे गोविंदा!" हरमल बीचवर चक्क विदेशी पर्यटकांनी गायले 'भजन'; गोव्याच्या किनाऱ्यावरील व्हिडिओ तुफान व्हायरल

IFFI: 'इफ्फीसाठी गोव्यात येणे म्हणजे नवीन शिकण्याजोगे'! प्रसिद्ध दिग्दर्शक अलींचे गौरवोद्गार; सिनेमात जग बदलण्याची क्षमता असल्याचे मांडले मत

Goa Opinion: गोव्यातल्या वाढत्या दरोड्यांमुळे लोकांच्यात वाढलेली भीती, पोलिसांच्या बदल्या; वरवरचे बदल करून काय साध्य होणार?

Rama Kankonkar: "मी माहिती दिली, आता त्या 2 राजकारण्यांची चौकशी करा!", हल्ला प्रकरणी रामा काणकोणकर यांची पोलिसांकडे थेट मागणी

IFFI 2025: 'इफ्फी'च्या कार्यक्रमस्थळी गोमंतकीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार दिसायला हवे होते; परंतु चित्र मात्र अगदीच वेगळे..

SCROLL FOR NEXT