Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात होणार बंपर वाढ, सरकारकडून कन्फर्म !

7th Pay Commission Big Update: देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2023 हे वर्ष नोकरदारांसाठी खूप फायदेशीर असणार आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission Latest Update: देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2023 हे वर्ष नोकरदारांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. येत्या वर्षभरात कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात बंपर वाढ होणार आहे. त्यासाठी आतापासून तयारी सुरु झाली आहे. महागाई भत्त्याव्यतिरिक्त सरकार मूळ वेतनातही वाढ करणार आहे.

पगारात डीए जोडला जाईल

याशिवाय, सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जेव्हा कर्मचार्‍यांचा (Employees) महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे जाईल, तेव्हा सरकार डीए शून्यावर आणेल. यासोबतच ही रक्कम मूळ वेतनात जोडली जाणार असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

जानेवारी 2023 मध्ये DA वाढेल

केंद्र सरकार (Central Government) जानेवारी 2023 मध्ये डीएमध्ये बंपर वाढ करणार आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए 41 टक्के होईल. त्याचे आकडेही आता समोर येऊ लागले आहेत. सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो.

पगार कसा वाढणार?

यावेळी कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 18,000 रुपये गृहीत धरले तर डीए 50 टक्के होतो. त्यामुळे या परिस्थितीत 9000 रुपये महागाई भत्ता देण्यात येणार आहेत. 50% DA वर, महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल आणि हे 9000 रुपये तुमच्या मूळ वेतनात जोडले जातील. म्हणजेच, तुमची बेसिक 18000 वरुन 27,000 रुपये होईल.

यापूर्वी हे घडले

नियमांनुसार, कर्मचार्‍यांना मिळणारा डीए 100% मूळ पगारात देण्यात येणार आहे. 2016 मध्ये सरकारने नियम बदलले होते, त्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT