Money DaINIK Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: या कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, पदोन्नतीमुळे मिळाला दुप्पट बोनस

Railway Employees Promotion: नवीन प्रणालीनुसार रेल्वे कर्मचाऱ्यांना ग्रुप ए पर्यंत पदोन्नती दिली जाऊ शकते.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission Latest News: तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी रेल्वेत सुपरवायझर श्रेणीत काम करत असेल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमधील सुपरवायझर श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या नवीन प्रणालीला मंजुरी दिली आहे. नवीन प्रणालीनुसार रेल्वे कर्मचाऱ्यांना ग्रुप ए पर्यंत पदोन्नती दिली जाऊ शकते.

80 हजार कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळणार

रेल्वेच्या या निर्णयाचा 80 हजार कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे. अनेक दिवसांपासून रेल्वे कर्मचाऱ्यांकडून (Employees) ही मागणी करण्यात येत होती. आता ती रेल्वेने मान्य केली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या या निर्णयामुळे आर्थिक फरक पडणार नाही.

दरमहा चार हजार रुपयांची वाढ होणार

भारतीय रेल्वेने (Indian Railways) घेतलेल्या या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या लोकांसाठी नवीन संधी खुल्या होणार आहेत. त्यामुळे त्यांचा पगार महिन्याला अडीच ते चार हजार रुपयांनी वाढणार आहे. चार हजार रुपयांच्या आधारे त्यांना वार्षिक 48 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे.

वंदे भारताबाबत मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांत वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनसोबत झालेल्या प्राण्यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मोठे पाऊल उचलण्यात आल्याचेही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले. येत्या पाच ते सहा महिन्यांत 100 किमीपर्यंतची सीमारेषा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वंदे भारत ट्रेनची जनावरांशी होणारी टक्कर टळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT