7th Pay Commission Fitment Factor: केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक मोठे अपडेट आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल झाल्यानंतर पगार रचनेतही बदल होणार आहे. नव्या आर्थिक वर्षात त्यात बदल अपेक्षित होता. पण आता सप्टेंबरमध्ये नवा महागाई भत्ता जाहीर झाला आहे. त्यामुळे फिटमेंट फॅक्टरमध्येही बदल अपेक्षित आहे.
बदलाचा परिणाम संपूर्ण पगारावर होईल
केंद्रीय कर्मचार्यांच्या पगार रचनेत फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावते. यातील बदलांचा परिणाम संपूर्ण पगारावर होतो. सध्या तो 2.57 टक्के असून त्यानुसार पगार मिळतो. मात्र तो वाढवून 3.68 करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार (Government) नव्या वर्षाच्या आधी डिसेंबरपर्यंत त्यात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते.
कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपये
सप्टेंबरमध्ये महागाई (Inflation) भत्ता वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा (Employees) महागाई भत्ता 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपये आहे. यावर निर्णय झाल्यानंतर तो 26000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. मात्र, अद्याप याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पगार असा आणि इतका वाढेल
सध्या, 18,000 X 2.57 = रु. 46260 मिळतात, इतर भत्ते वगळून फिटमेंट फॅक्टर 2.57 पट आणि मूळ वेतन रु. 18000. परंतु जर तो 3.68 पर्यंत वाढवलो तर कर्मचाऱ्यांचे इतर भत्ते वगळून पगार रु. 26000 X 3.68 = रु. 95680 होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.