Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी 3 दिवसांनी येणार आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात होणार बंपर वाढ!

DA Hike July 2023: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सरकारने मार्चमध्ये महागाई भत्ता (DA) जाहीर केला होता.

Manish Jadhav

DA Hike July 2023: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सरकारने मार्चमध्ये महागाई भत्ता (DA) जाहीर केला होता. जानेवारी 2023 चा DA सरकारने मार्चमध्ये जाहीर केला होता.

पुढील महागाई भत्ता सहा महिन्यांनी जाहीर केला जातो. दर सहा महिन्यांच्या आधारावर, यावेळी सरकार जुलैसाठी महागाई भत्ता जाहीर करेल.

तथापि, एआयसीपीआय निर्देशांकाच्या आधारे जुलैचा डीए सप्टेंबरमध्ये जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारी सुरु झाली आहे.

आता 42% महागाई भत्ता मिळत आहे

1 जुलै 2023 पासून सरकारी कर्मचार्‍यांसाठी (Employees) लागू होणार्‍या महागाई भत्त्यात (DA Hike) किती वाढ होईल, याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

सध्या सरकारकडून (Government) कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. त्याची अंमलबजावणी जानेवारी 2023 पासून करण्यात आली आहे.

एप्रिलच्या पगारात वाढीव डीए आणि थकबाकीचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात येतील. 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत दर 6 महिन्यांनी DA सुधारित केला जातो.

मार्चचा आकडा 28 एप्रिलच्या संध्याकाळी येईल.

जुलैपासून वाढणारा महागाई भत्ता, जानेवारी ते जून 2023 पर्यंत AICPI निर्देशांकाच्या आधारे कर्मचाऱ्यांना दिला जाईल.

नवीन महागाई भत्त्यासाठी AICPI निर्देशांकाची नवीन गणना 28 एप्रिल रोजी संध्याकाळी येईल. यावरुन या वेळी महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे.

सध्या निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता 43.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच फेब्रुवारीपर्यंत 44 टक्के महागाई भत्ता निश्चित करण्यात आला आहे. आता मार्चचा आकडा 28 एप्रिलच्या संध्याकाळी येईल.

तसेच, फेब्रुवारीमध्ये महागाई भत्त्यात वाढ झाली आहे, परंतु या महिन्यात निर्देशांकाचा आकडा 132.8 वरुन 132.7 वर आला आहे.

येत्या 28 एप्रिल रोजीच्या मार्चच्या डेटामध्ये उडी अपेक्षित आहे. यानंतर, एप्रिल, मे आणि जूनचे आकडे अंतिम महागाई भत्ता/महागाई सवलत (DA/DR) चे गुण ठरवतील.

यावेळीही महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यानुसार सध्याच्या 42 टक्क्यांवरुन 46 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'मनोहर पर्रीकर फिरायचे तसे तुम्हीही फिरत जा'; पुण्यात पाहणी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना महिलेचा सल्ला Watch Video

Socorro: मान्सूनच्या आगमनापासून वेगवेगळे रंग धारण करणारे 'सुकूर पठार'

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

SCROLL FOR NEXT