Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी; DA मध्ये होणार इतकी वाढ!

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही वाढीव पगाराची वाट पाहत असाल तर तुम्हाला फक्त काही दिवस वाट पाहावी लागेल.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही वाढीव पगाराची वाट पाहत असाल तर तुम्हाला फक्त काही दिवस वाट पाहावी लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीसाठी अवघे 15 दिवस उरले आहेत.

डीएचा आकडा 31 जानेवारीला जाहीर होणार आहे. या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होईल की, या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तुमचा पगार किती वाढणार आहे. एआयसीपीआय इंडेक्सचा डेटा दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला प्रसिद्ध केला जातो.

पगार वाढेल

यावेळी, त्यांच्या पगारात बंपर वाढ होण्याची आशा कर्मचाऱ्यांना आहे. आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सरकार होळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करु शकते. AICPI निर्देशांकाच्या आधारे, महागाई (Inflation) भत्ता किती टक्के वाढेल हे ठरवले जाते.

नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार 3 टक्क्यांनी वाढ होऊ शकते

नोव्हेंबर 2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार आहे. डिसेंबर महिन्यात या निर्देशांकात बदल न झाल्यास कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारात 3 टक्के वाढ होणार आहे. दुसरीकडे, जर निर्देशांकात 1 अंकाची वाढ झाली तर डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

आता 38 टक्के डीए मिळत आहे

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांना 41 टक्के दराने डीए मिळेल. जुलै 2022 मध्ये सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 38 टक्के वाढ केली होती.

दरवाढ कधी जाहीर होणार?

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा मार्च महिन्यात होऊ शकते. 1 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजूरी मिळू शकते, म्हणजेच कर्मचाऱ्यांना 31 मार्चपासून वाढीव पगार मिळू शकतो, असे माध्यम सूत्रांनी सांगितले. यासोबतच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे थकबाकीसह खात्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT