Money DaINIK Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: नवीन वर्षापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ!

7th Pay Commission Latest News: तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर नवीन वर्षात त्यांच्यासाठी मोठी बातमी वाट पाहत आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission DA Hike: तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर नवीन वर्षात त्यांच्यासाठी मोठी बातमी वाट पाहत आहे. होय, कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीच्या आधारे जानेवारीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन वर्षापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. AICPI निर्देशांकाची ऑगस्टची आकडेवारी कामगार मंत्रालयाने जाहीर केली आहे.

AICPI निर्देशांकात 1.2 अंकांची वाढ

सप्टेंबर 2022 च्या तुलनेत, ऑक्टोबरसाठी AICPI निर्देशांकात 1.2 अंकांची वाढ झाली आहे. तो ऑक्टोबरमध्ये 132.5 च्या पातळीवर गेला होता, तर सप्टेंबरमध्ये तो 131.3 टक्के होता. यापूर्वी ऑगस्टमध्ये हा आकडा 130.2 अंक होता. जुलै महिन्यापासून यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सततच्या वाढीमुळे, जानेवारीत 65 लाख कर्मचार्‍यांच्या (Employees) महागाई भत्त्यात वाढ होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. या आधारे कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये निश्चितपणे 4 टक्के वाढ करण्यात आली आहे.

DA किती वाढणार

जुलैचा महागाई (Inflation) भत्ता 4 टक्क्यांनी वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. आता त्यात पुन्हा 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर 42 टक्के होईल. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए (डीए वाढ) वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारी 2022 आणि जुलै 2022 चा DA जाहीर झाला आहे. आता जानेवारी 2023 चा डीए जाहीर केला जाईल.

डेटा कोण जारी करतो?

AICPI निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे ठरविले जाते? दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) ची आकडेवारी कामगार मंत्रालयाद्वारे जारी केली जाते. हा निर्देशांक 88 केंद्रांसाठी आणि संपूर्ण देशासाठी तयार करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT