Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: DA वाढीवरुन पडदा उठला, या तारखेला महागाई भत्ता वाढणार!

DA Hike in March 2023: सरकारने 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission Latest News: सरकारने 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरुन 38 टक्के झाला आहे. केंद्राने डीए वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आसाम, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, कर्नाटक आणि राजस्थान आदी राज्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

डीए वर्षातून दोनदा वाढवला जातो

दिवाळीचा सण संपला. इतर काही राज्य सरकारांकडून लवकरच डीए वाढीची घोषणा केली जाणार आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील डीए (DA) वाढीची प्रतीक्षा आहे. आता यापुढील महागाई भत्ता वाढ सरकार कधी जाहीर करणार, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये (Employees) आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA Hike) वर्षातून दोनदा वाढवला जातो.

3 ते 5 टक्के वाढ अपेक्षित आहे

दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पहिल्यांदा जानेवारीत आणि दुसऱ्यांदा जुलैमध्ये वाढ करण्याची तरतूद आहे. मात्र, यंदा केंद्राने पहिली डीए वाढ मार्चमध्ये तर दुसरी सप्टेंबरमध्ये जाहीर केली. जर या ट्रेंडबद्दलच बोलायचे झाल्यास तर, सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च 2023 मध्ये पुढील डीए वाढ मिळेल अशी अपेक्षा आहे. यासोबतच केंद्राकडून डीएमध्ये 3 ते 5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

मार्च 2023 मध्ये DA वाढ अपेक्षित आहे

मार्च 2022 मध्ये सरकारने डीए 31 टक्क्यांवरुन 34 टक्के केला आहे. सरकारच्या या पावलाचा फायदा 48 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना झाला. त्यानंतर 6 महिन्यांनी सप्टेंबर 2022 मध्ये पुढील डीए वाढीची घोषणा करण्यात आली. यावेळी सरकारने (Government) डीए 4 टक्क्यांनी वाढवून 38 केला. आता पुढील डीए वाढ मार्च 2023 मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT