Money
Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: गूड न्यूज, फिटमेंट फॅक्टरवर आले मोठे अपडेट; 'या' दिवशी होणार पगारवाढीची घोषणा!

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2023 मध्ये लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. डीए वाढवण्यासोबतच फिटमेंट फॅक्टरवरही एक मोठी अपडेट समोर आला आहे. केंद्र सरकार नवीन वर्षात डीए तसेच फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करणार आहे. म्हणजेच, नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना दुहेरी आनंदाची बातमी मिळणार आहे.

3.68 पट करण्याची मागणी आहे

अनेक दिवसांपासून कर्मचारी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत. फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात बंपर वाढ होणार आहे. सध्या कर्मचार्‍यांना 2.57 टक्केनुसार फिटमेंट फॅक्टर देण्यात येत असून, त्यात 3.68 पट वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

किमान मूळ वेतन 26,000 रुपये असेल

जर कर्मचार्‍यांचा (Employees) फिटमेंट फॅक्टर 2.57 वरुन 3.68 पर्यंत वाढला तर कर्मचार्‍यांचा मूळ पगार थेट 18,000 रुपयांवरुन 26,000 रुपयांपर्यंत वाढेल. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात बंपर वाढ होणार आहे.

2016 मध्ये पगारात बंपर वाढ झाली होती

यापूर्वी, सरकारने (Government) 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केली होती आणि त्याच वर्षापासून सातवा वेतन आयोग देखील लागू करण्यात आला होता, त्यानंतर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 6000 रुपयांवरुन थेट 18,000 रुपये झाले होते. त्याचवेळी, जर कमाल मूळ वेतनाबद्दल बोलायचे झाल्यास, 90,000 रुपयांवरुन 2.5 लाख रुपये झाले होते.

जानेवारीत डीए वाढेल

यासोबतच, जानेवारी महिन्यात सरकार डीएमध्ये बंपर वाढ करणार आहे. जानेवारी महिन्यातही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होईल, त्यानंतर डीए 41 ते 42 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

लाखो लोकांना लाभ झाला

सरकारने नुकताच डीए वाढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढून 38 टक्के झाला आहे. सरकारच्या या निर्णयाचा 48 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना मोठा फायदा झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pernem Rain : वादळी वाऱ्यामुळे पेडणे तालुक्यात पडझड सुरूच

Dhargal Fatal Accident: धारगळ अपघात प्रकरणात अखेर खूनाचा गुन्हा दाखल

Sanguem News : सांगेत मुख्य रस्त्यावरील गटारांची सफाई गरजेची

United Nations: गाझामधील युद्ध थांबवले नाही तर... संयुक्त राष्ट्रात भारताने इस्रायल आणि हमासला सुनावले

Goa Today's Live News: पणजी महानगरपालिका कर कपात करणार - महापौर रोहित मोन्सेरात

SCROLL FOR NEXT