Money | 7th Pay Commission Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: मोदी सरकार उद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना देणार मोठी भेट, पगार थेट 27,000 रुपयांनी वाढणार!

DA Hike Latest Update News: सरकार थेट 27,000 रुपये वाढवत आहे. त्यावर उद्या म्हणजेच शुक्रवारी शिक्कामोर्तब होऊ शकतो. त्यानंतरच मंत्रालयाकडून अधिसूचना जारी केली जाईल.

Manish Jadhav

7th Pay commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही डीए वाढीची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा संपणार आहे. केंद्र सरकार महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवणार आहे. या वाढीनंतर तुमच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.

सरकार थेट 27,000 रुपये वाढवत आहे. त्यावर उद्या म्हणजेच शुक्रवारी शिक्कामोर्तब होऊ शकतो. त्यानंतरच मंत्रालयाकडून अधिसूचना जारी केली जाईल.

लाखो पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाची (Union Cabinet) बैठक उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार असून त्यानंतरच पगार वाढणार आहे. आता शुक्रवारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली असून, त्यात पगारवाढीची घोषणा करण्यात येणार आहे. याचा थेट फायदा लाखो पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे.

शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे

याआधी, मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी होणार होती, मात्र काही कारणांमुळे ही बैठक शुक्रवारी होणार असून, त्यात 4 टक्के महागाई भत्त्याला मंजुरी मिळणार आहे.

यानंतरच अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी केली जाईल. अधिसूचना जारी झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार असल्याचे सरकारने (Government) सांगितले आहे.

पगारात 27,000 रुपयांनी वाढ होणार आहे

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर त्याच्या पगारात दरमहा 720 रुपयांची वाढ होईल, म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात 8640 रुपयांची वाढ होईल. (वार्षिक आधारावर)

दुसरीकडे, कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन दरमहा 56900 रुपये असल्यास त्यांच्या पगारात दरमहा 2276 रुपयांची वाढ होईल, म्हणजेच वार्षिक आधारावर पगारात 27312 रुपयांची वाढ होईल. सरकारकडून लवकरच पगार वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT