Jeff Bezos and Lauren Sanchez
Jeff Bezos and Lauren Sanchez Dainik Gomantak
अर्थविश्व

Jeff Bezos: पत्रकार, पायलट आणि अभिनेत्री! वाचा, जेफ बेझोस यांच्या प्रेयसीविषयी

गोमन्तक डिजिटल टीम

Jeff Bezos and Lauren Sanchez: अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि त्यांची प्रेयसी लॉरेन सांचेझ यांची नुकतीच इंगेजमेंट झाल्याचे समोर आले आहे. बेझोस यांनी आपल्या $500 दशलक्ष किंमतीच्या सुपरयाटवर सांचेझ यांना प्रपोज केल्याचेही काही अमेरिकन वृत्तपत्रांनी स्पष्ट केले आहे.

अष्टपैलू व्यक्तीमत्व

1969 मध्ये अमेरिकेतील अल्बुकर्क येथे जन्मलेल्या, 53 वर्षीय लॉरेन सांचेझ यांनी काही काळ रिपोर्टर आणि न्यूज अँकर म्हणून काम केले आहे. त्यांनी 2011 ते 2017 या कालावधीत गुड डे LA मॉर्निंग शो होस्ट केला होता. तसेच द लॉन्गेस्ट यार्ड , फ्लाइट क्लब आणि टेड 2 सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सांचेझ यांच्याकडे हेलिकॉप्टर पायलट परवाना देखील आहे.

फ्लाइट अटेंडंट व्हायचे स्वप्न भंगले

2016 मध्ये, लॉरेन यांनी स्वतःची Black Ops Aviation कंपनी लाँच केली. ही हवाई चित्रपट आणि निर्मिती कंपनी असून, अशा प्रकारच्या कंपनीची स्थापना करणाऱ्या लॉरेन या पहिल्या महिला आहेत. लहाणपणी फ्लाइट अटेंडंट व्हायचे स्वप्न पहणाऱ्या लॉरेन यांना त्यांच्या वजनामुळे आपले स्वप्न साकारता आले नाही.

2018 पासून बेझोस यांच्याशी डेटींग

सांचेझ यांनी 2018 मध्ये अ‍ॅमेझॉनचे बॉस बेझोस यांना डेट करण्यास सुरुवात केली. बेझोस यांचा त्यांची पहिली पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर या जोडप्याने 14 जुलै 2019 रोजी त्यांचे नातेसंबंध सार्वजनिक केले.

तीन मुलांची आई

लॉरन सांचेझ यांनी आधी हॉलिवूड एजंट पॅट्रिक व्हाईटसेल यांच्याशी लग्न केले होते ज्यांच्याकडून सांचेझ यांना दोन मुले आहेत, एला आणि इव्हान. सांचेझ यांना माजी NFL खेळाडू टोनी गोन्झालेझकडून 22 वर्षांचा मुलगा निक्को देखील आहे.

अंतराळ प्रवासाचा मानस

सांचेझ यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये ब्लू ओरिजिनच्या संस्थापक जेफ बेझोस यांच्या पावलावर पाऊल ठेवून अंतराळात प्रवास करण्याचा त्यांचा मानस व्यक्त केला आहे. त्या बेझोस अर्थ फंडाच्या उपाध्यक्षा म्हणूनही काम करतात, ही संस्था बेझोस यांनी सुरू केली असून ती हवामान बदल रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी समर्पित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT