2 हजारच्या नोटांबाबत RBI ची घोषणा अन् Zomato ने केलं खिल्ली उडवणारं ट्वीट, नेमकं प्रकरण काय?

आरबीआयच्या घोषणेनंतर झोमॅटोवर होउ लागला 2000 हजारांच्या नोटांचा पाउस...वाचा नेमकं काय झाले आहे.
Zomato
Zomato Dainik Gomantak
Published on
Updated on

Zomato: भारतीय रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. आजपासून सर्वांना कोणत्याही बँकेमध्ये जाऊन नोटा बदलता येणार आहे. या नोटा बदलण्यासाठी अंतिम तारिख ही 30 सप्टेंबर आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत शुक्रवारी (19 मे) ला मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 2000 रुपयांची नोट मागे घेतली जाणार आहे. परंतु नोटांची यापुढे छापाई बंद केली जाणार आहे.

यामुळे सर्वांची घरात असलेल्या 2 हजारांच्या नोटा बदलण्याची घाई सुरु झाली आहे. पण या सगळ्यांमध्ये झोमॅटोने सोशल मिडियावर एक मजेदार ट्विट शेअर केले आहे.

दरम्यान, फूड डिलिव्हरी अॅप Zomato ने एक मजेदार ट्वीट केले आहे. झोमॅटोने ट्वीट करून लिहिले की, आरबीआयच्या घोषणेनंतर आता 72 टक्के सीओडी ऑर्डर लोक 2 हजार रुपयांच्या नोटांनी भरत आहेत.

म्हणजेच जेवण ऑर्डर करण्यासोबतच लोक या भन्नाट युक्तीने 2000 रुपयांच्या नोटाही बदलून देत आहेत. यासोबत Zomato ने एक मजेशीर ट्वीट देखील केले आहे, ज्यामध्ये कंपनीने लिहिलं आहे की- 'शुक्रवारपासून, आमच्या कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरपैकी 72% रक्कम ₹ 2000 च्या नोटांनी भरले आहे'

Zomato स्वतःचा UPI सुरू करणार 

मीडिया रिपोर्टनुसार, Zomato UPI सेवा लवकरच सुरू करणार आहे. यामुळे ग्राहकांना पेमेंट करणे सोपे जाणार आहे. UPI लाँच करण्याचा उद्देश ग्राहकांसाठी ऑनलाईन पेमेंट सुलभ व्हावे हाच आहे.

आतापर्यंत असे होते की, लोक Zomato ऑर्डरसाठी Google Pay, Paytm आणि इतर UPI अॅप्सद्वारे पैसे देत होते. झोमॅटोवरुन पार्सल मागवल्यानंतर त्याचे पेमेंट करण्यासाठी त्यांना इतर अॅप्सवर स्विच करावे लागते.

त्यामुळेच ग्राहकांसाठी ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी Zomato स्वतःचं UPI नेटवर्क आणत आहे, जेणेकरून लोक अॅपवरूनच पेमेंट करू शकणार आहे.

नुकतीच झोमॅटोने यूपीआय सेवा सुरु केली आहे. ही सेवा सुरु करण्यामागील कंपनीचा मुख्य उद्देश्य, लोकांसाठी ऑनलाईन पेमेंटची चांगली सुविधा उपलब्ध करुन देणे हा आहे. या यूपीआय सेवेमुळे ग्राहकांना झोमॅटो अॅपच्या माध्यमातून पेमेंट करणे अत्यंत सोपं होणार आहे.

परंतु, यासाठी ग्राहकांना कोणतेही एक बँक अकाउंट सेव्ह केल्यानंतर नवीन यूपीआय ओळखपत्र बनवावे लागणार आहे. तसेच, सध्या जे लोक पेमेंट करण्यासाठी Paytm, PhonePe आणि Google Pay सारख्या यूपीआय प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत त्यांना त्यावर रिडायरेक्ट करण्याची आवश्यकता पडणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com