Flashback 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

Flashback 2022 : ‘या’ 5 गॅजेट्सनी घेतला २०२२ मध्ये ग्राहकांचा निरोप

तंत्रज्ञान क्षेत्रात या वर्षी अनेक नवीन आणि अनोखे फीचर्स असलेले स्मार्टफोन आणि इतर गॅजेट्स लाँच झालेत. यावर्षी अनेक गॅजेट्सने लोकांचा निरोप घेतला. कोणते आहेत हे गॅजेट्स? जाणून घेऊया.

गोमन्तक डिजिटल टीम

तंत्रज्ञान क्षेत्रात या वर्षी अनेक घडामोडी घडल्या. अनेक नवीन आणि अनोखे फीचर्स असलेले स्मार्टफोन आणि इतर गॅजेट्स लाँच झालेत. अ‍ॅपले या वर्षी आयफोन १४ सिरीज लाँच केली. आयफोन १४ क्रॅश डिटेक्शन फीचर आणि एसओएस सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचरमुळे चर्चेत आहे, तर नथिंग फोन हा देखील ग्लिफ इंटरफेसमुळे चर्चेत राहिला. यावर्षी जबरदस्त फीचर असलेल्या फोन्सचे लोकांनी स्वागत केले, तर यावर्षी अनेक गॅजेट्सने लोकांचा निरोप घेतला. कोणते आहेत हे गॅजेट्स? जाणून घेऊया.

1) आयपॉड टच-

या वर्षी iPod Touch बंद करण्यात आला. अ‍ॅपलचे माजी सीईओ आणि सहसंस्थापक स्टिव्ह जॉब्स यांनी २००१ मध्ये आयपॉड लाँच केला होता. आयपॉड हा एक म्युझिक प्लेअर आहे. आयपॉडचा शेवटचा मॉडेल हा जवळपास आयफोन ४ सारखा दिसतो. अ‍ॅप्स आणि गेम्सचा अनुभव घेण्यासाठी आयपॉड टच हा उत्तम एन्ट्री लेव्हल डिव्हाइस होता, मात्र अ‍ॅपल आयफोन आल्यानंतर त्यास उतरती कळा लागली. आयफोनमध्येही सारखेच फीचर मिळतात. त्याचबरोबर, स्पॉटिफाय आणि अ‍ॅपल म्युझिक सारख्या स्ट्रिमिंग सेवांमुळे आयपॉड टच अनावश्यक वाटू लागला.

2) गुगल स्टाडिआ-

Google Stadia २०१९ मध्ये लाँच झाला होता. स्टाडिआ ही एक क्लाऊड गेमिंग सेवा आहे. स्टाडिआला कोणते युजर्स प्रतिसाद देतील याबाबत स्पष्टता नव्हती. जेव्हा गुगलने रेड डेड रिडेम्पशन २ आणि सायबरपंक २०७७ स्टाडिआवर ऑफर केला तेव्हा लोकांकडे आधीच हे गेम्स होते किंवा त्यांच्याकडे असलेल्या प्लाटफॉर्मसाठी ते विकते घेऊ इच्छित होते. स्टाडिआ प्रभावी तंत्रज्ञानावर बनवले गेले होते, मात्र ते अयशस्वी ठरले.

3) ब्लॅकबेरी-

या वर्षी BlackBerry उपकरणांनी तंत्रज्ञान प्रेमींचा निरोप घेतला. जुन्या ब्लॅकबेरी फोन्सना योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व्हर बंद केल्याची घोषणा ब्लॅकबेरी कंपनीने केली आहे. ब्लॅकबेरीच्या स्वतःच्या सॉफ्टवेअर चालणारे कोणतेही फोन किंवा टॅब्लेट यापुढे विश्वसनीयरित्या कार्य करणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. याचा अर्थ जुन्या ब्लॅकबेरी डिव्हाइसवर कॉल करता येणार नाही किंवा एसएमएस पाठवता येणार नाही.

4) अमेझॉन ग्लो-

अमेझॉन ग्लो हे एक चॅट डिव्हाइस असून त्यामध्ये टेबल प्रोजेक्टर होते. या उपकरणाद्वारे मुलांना व्हिडिओ चॅट करता येत होते. हे उपकरण टचद्वारे प्रतिसाद देणाऱ्या टेबलवर गेम्स, बूक किंवा पझल प्रक्षेपित करत होते. Amazon Glow हे अनोखे उत्पादन होते, मात्र सहा महिन्यानंतर त्याची विक्री थांबवण्यात आली. ग्लोच्या बंद होण्याचे कारण स्पष्ट नाही, परंतु अमेझॉनच्या सद्यस्थितीमध्ये खोलवर जाऊन पाहिले असता असे स्पष्ट होते की, कंपनीने प्रायोगिक उपकरणे सोडून देणे आणि त्याऐवजी दीर्घकाळ नफा कमावण्याची क्षमता असलेल्या उत्पादनांवर आणि सेवांवर लक्ष केंद्रित करणे निवडले आहे.

5) अ‍ॅपल वॉच सिरीज ३

पाच वर्षांपेक्षा अधिक काळ अ‍ॅपलने Apple Watch Series 3 स्मार्टवॉचची विक्री केली. ही बजेट फ्रेंडली वॉच होती. मात्र घड्याळामध्ये नवीन युगाला साजेसे असे डिजाईन नव्हते आणि त्यात मंद गतीचे प्रोसेसर होते. ही वॉच आता बंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

हडफडे अग्नितांडव प्रकरण! 'बर्च बाय रोमिओ लेन'च्या मालकांचे धाबे दणाणले; अजय गुप्ताची जामिनासाठी कोर्टात धाव

Goa Raj Bhavan Name Change: गोव्यात ऐतिहासिक निर्णय! 'राजभवन' आता ओळखले जाणार 'लोकभवन' नावाने; राज्यपालांनी पुसली वसाहतवादी ओळख

Cyber Fraud: 'अनन्या'च्या जाळ्यात अडकला एसबीआय क्लर्क, फेसबुकवरची एक फ्रेंड रिक्वेस्ट अन् 92 लाखांचा गंडा; काय नेमकं प्रकरण?

बेतुल ONGC परिसरात अग्नितांडव! वेल्डिंगच्या ठिणगीमुळे भीषण आग; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT