PM Kisan च्या 13 व्या हप्त्याची तारीख निश्चित, 'या' लोकांना मिळणार एक पैसाही नाही!

PM Kisan 13th Instalment: पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांमध्ये तुमचेही नाव समाविष्ट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan Yojana Dainik Gomantak

PM Kisan 13th Instalment: पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांमध्ये तुमचेही नाव समाविष्ट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पीएम किसानच्या 13 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत. पंतप्रधान मोदी हे पैसे डायरेक्‍ट बेन‍िफ‍िट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. गेल्या वेळी 8.42 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा लाभ देण्यात आला होता. यावेळी ही संख्या कमी असण्याची शक्यता आहे.

बँक खाते आधारशी लिंक करा

कृषी उपसंचालक रामप्रवेश यांनी सांगितले की, पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता 15 ते 20 जानेवारी दरम्यान येण्याची शक्यता आहे. त्यासाठी 7 जानेवारीपर्यंत प्रलंबित कामे मार्गी लावणे आवश्यक आहे. त्यांनी पुढे सांगितले की, 13 व्या हप्त्यासाठी, ई-केवायसीसह, बँक खाते आधारशी लिंक करा. याशिवाय, बँकेत (Bank) जा आणि NPCI मध्ये आधार लिंक केलेले बँक खाते सीड करा. यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्याची वरील तीन कामे झाली नाहीत, तर त्याची पीएम किसान सन्मान निधीची रक्कम थांबवली जाईल.

PM Kisan Yojana
PM Kisan: PM मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट! खात्यात येणार 15 लाख रुपये; असा करा अर्ज

लाभार्थ्यांची संख्या 8.42 कोटी

पीएम किसान या सरकारच्या (Government) महत्त्वाकांक्षी योजनेतर्गंत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे लाभार्थ्यांना 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. अलीकडेच, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत सांगितले होते की, ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत 12 व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या 8.42 कोटी झाली आहे. पहिल्या हप्त्यातील लाभार्थ्यांची संख्या 3.16 कोटी होती.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana : 'या' शेतकऱ्यांना बसू शकतो मोठा धक्का, मिळणार नाही पीएम किसानचा 13 वा हप्ता!

तसेच, या योजनेत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. यानंतर केंद्र सरकारने सोशल ऑडिट करुन तहसील स्तरावर केलेल्या पडताळणीच्या आधारे कोट्यवधी शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली. सूचीमध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी, तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुमचे नाव तपासू शकता. 11 व्या हप्त्यात PM किसान निधीचा सर्वाधिक लाभ 10.45 कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com