SBI Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI ला महिला आयोगाने बजावली नोटीस, '3 महिन्यांची गर्भवती महिला नोकरीसाठी अनफिट'

नव्या गाइडलाईननुसार (Guideline) या गर्भवती महिला तात्पुरत्या काळासाठी नोकरी करण्यासाठी अनफिट असल्याचा हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

आजच्या आधुनिक काळात महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्या नोकरीच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमठवत आहेत. मात्र आता एका नामांकित राष्ट्रीयकृत बॅंकेने जारी केलेल्या गाईडलाईनमुळे समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. या राष्ट्रीयीकृत बॅंकेने धक्कादायक दावा या नव्या गाइडलाईनमधून केला आहे. 3 महिन्यांची गर्भवती महिला नोकरीच्या पात्रतेसाठी तात्पुरत्या कालावधीसाठी अनफिट असल्याचा दावा या राष्ट्रीयीकृत बॅंकेने केला आहे. नव्या गाइडलाईननुसार या गर्भवती महिला तात्पुरत्या काळासाठी नोकरी करण्यासाठी अनफिट असल्याचा हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. नवी गाइडलाईन जारी करणारी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) असल्याची माहिती मिळत आहे. (3 Months Pregnant Woman Unfit For The Job As Per SBIs New Guideline)

दरम्यान, स्टेट बॅंकेच्या नव्या गाइडलाईनवर दिल्ली महिला आयोगाच्या (Delhi Women's Commission) प्रमुख स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी खेद व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांनी या बॅंकेला नोटीस पाठवून तात्काळ उत्तर देण्याची मागणी केली आहे. मालीवाल यांच्या म्हणण्यानुसार, बॅंकेने जारी केलेल्या नव्या गाइडलाईन्स नियमाबाह्य आणि भेदभाव करणाऱ्या आहेत. सोशल मिडियावरील ट्वीटवरुन नव्या गाइडलाईन्सची कॉपी शेअर करत त्यांनी बॅंकेला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पुढे म्हणाल्या, बॅकेकडून जारी करण्यात आलेल्या नव्या गाइडलाईनवरुन स्पष्ट होते की, 3 महिन्यांपेक्षा जास्त गर्भवती असलेल्या महिला कर्मचारीला बॅंकेला सेवेत रुजू करुन घ्यायचं नाही. या गाइडलाईन्स केवळ भेदभावच करत नाहीत तर त्या परस्पर भेदभावही करतात. हा भेदभाव करणारा नियम तात्काळ मागे घ्या, अशी मागणी करणारी नोटीसही स्टेट बॅंक इंडियाला बजावली आहे.

सोशल मीडियावर लोकांचा रोष उसळला

बँकेच्या या निर्णयावर सोशल मीडियावर लोक प्रचंड संतापले आहेत. बँकेच्या या नियमाला लोकांनी भेदभावपूर्ण म्हटले आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी बँकेने जारी केलेल्या फिटनेस मानकांनुसार, गर्भधारणा तीन महिन्यांपेक्षा जास्त असल्यास, महिला उमेदवारास तात्पुरते अपात्र मानले जाईल. या परिस्थितीत, मुलाच्या जन्मानंतर चार महिन्यांच्या आत त्यांना सामील होण्याची परवानगी दिली जाऊ शकते. यापूर्वी, 6 महिन्यांपर्यंत गर्भधारणा असलेल्या महिला उमेदवारांना विविध अटींच्या अधीन राहून बँकेत रुजू होण्याची परवानगी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

SCROLL FOR NEXT