सुप्रसिद्ध जपानी दुचाकी निर्माता कावासाकीनं भारतात 2025 मॉडेलची Ninja 300 लॉन्च केली असून, तिची एक्स-शोरूम किंमत 3.43 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. नव्या मॉडेलमध्ये यांत्रिकदृष्ट्या कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नसला तरी, नवीन डिझाइन, ग्राफिक्स आणि आकर्षक रंग पर्याय ही त्याची खास वैशिष्ट्यं आहेत.
ही स्पोर्ट्स बाईक 296cc लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिनसह येते, जी नवशिक्या रायडर्स आणि स्पोर्ट्स बाइकप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय ठरते. यामध्ये ZX-6R पासून प्रेरित प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि ZX-10R प्रमाणे मोठा फ्लोटिंग विंडस्क्रीन देण्यात आला आहे, जो बाईकला अधिक आक्रमक लुक प्रदान करतो.
विशेष म्हणजे, या नव्या मॉडेलची किंमत मागील मॉडेलप्रमाणेच ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी ही एक आकर्षक संधी ठरू शकते.
Ninja 300 मॉडेलच्या डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या नव्या निन्जामध्ये ZX-6R पासून प्रेरित प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आला आहे, तर ZX-10R प्रमाणे मोठा फ्लोटिंग विंडस्क्रीन यामध्ये दिसतो. हे बदल बाइकच्या अॅग्रेसिव्ह लुकमध्ये भर घालतात. तसंच, नवीन ट्रेड पॅटर्न असलेल्या टायर्समुळं राइडिंग स्थिरता आणि रस्त्यावरची पकड पूर्वीपेक्षा अधिक सुधारली आहे. त्यामुळे स्पोर्टी लूकसह उत्तम परफॉर्मन्स मिळण्याची हमी ही बाइक देते.
कावासाकीने 2025 मध्ये आपल्या लोकप्रिय निन्जा 300 बाईकचा नवीन अवतार सादर केला आहे. या बाईकमध्ये 296cc लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आलं असून, हे इंजिन 11,000 rpm वर 38.8 bhp पॉवर आणि 10,000 rpm वर 26.1 Nm टॉर्क जनरेट करतं.
या बाईकमध्ये स्मूथ गिअर शिफ्टिंगसाठी सहा-स्पीड गिअरबॉक्स दिला असून, त्यासोबत असिस्ट आणि स्लिपर क्लचचा समावेश आहे. चेसिसच्या बाबतीत, यात ट्यूब्युलर डायमंड-टाइप फ्रेम वापरली गेली असून, इंजिनला स्ट्रेस्ड मेंबर म्हणून वापरलं गेलं आहे.
सस्पेंशन सेटअपमध्ये 37mm फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क्स (120mm ट्रॅव्हल) आणि रिअर मोनोशॉक (132mm ट्रॅव्हल) देण्यात आला आहे. ब्रेकसाठी दोन्ही चाकांवर पेटल-टाइप डिस्क ब्रेक्स असून, ड्युअल-चॅनल ABS सारखी सेफ्टी फिचर्सही उपलब्ध आहेत.
स्पोर्ट्स बाइक निन्जा 300 मध्ये आकर्षक रंग पर्यायांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन मॉडेलमध्ये लाइम ग्रीन, कँडी लाइम ग्रीन आणि मेटॅलिक मूनडस्ट ग्रे हे तीन रंग पर्याय देण्यात आले आहेत, जे याला अधिक स्टायलिश आणि स्पोर्टी लुक देतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.