
Monsoon Destinations In Goa
पावसाळा सुरु होताच गोव्याचा निसर्ग अधिकच खुलतो. हिरवाईने नटलेले डोंगर-दऱ्या, खळखळ वाहणारे धबधबे, गूढतावरील मंदिरे आणि निळसर तळी यामुळे गोवा हे फक्त समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित न राहता निसर्गप्रेमींसाठीही एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ ठरत आहे. यातीलच एक खास ठिकाण म्हणजे दक्षिण गोव्यातील नेत्रावळी.
नेत्रावळी हे गाव निसर्गसंपन्न परिसरामुळे प्रसिद्ध असून येथे असंख्य पर्यटक दरवर्षी भेट देतात. नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य हे येथील प्रमुख आकर्षण असून जैवविविधतेने समृद्ध असलेले हे अभयारण्य जंगलसफारी, ट्रेकिंग आणि पक्षीनिरीक्षणासाठी योग्य ठिकाण मानलं जातं.
दक्षिण गोव्यातील नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य हे अशाच नैसर्गिक संपत्तीचं एक अप्रतिम उदाहरण आहे. शहरापासून दूर, शांत, समृद्ध आणि रोमांचकारी अनुभव देणारं हे अभयारण्य पर्यटकांचं नवं आकर्षण बनतं आहे.
घनदाट जंगल, वाहते झरे, छोट्या तळी आणि विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध असलेल्या या अभयारण्यात भारतीय रानमांजर, साळिंदर, भेकर, हरण, असंख्य प्रकारचे साप आणि पक्षी आढळतात.
नेत्रावळी भागात असलेला नेटुर्लेम धबधबा (Neturlem Waterfall) हा पावसाळ्यात विशेषतः प्रवाहित होतो. धबधब्याच्या आजूबाजूचा परिसर हिरवळीत न्हालेला असून येथे ट्रेकिंग आणि फोटोग्राफीसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
तसेच, येथील आणखी एक अनोखे ठिकाण म्हणजे बुडबुड्याचं तळं (Bubbling Lake). हे तळं भूमिगत वायूंच्या हालचालीमुळे पाण्यात सातत्याने बुडबुडे निर्माण करतं. ही एक नैसर्गिक रासायनिक प्रक्रिया असली तरी पर्यटकांसाठी हा एक विस्मयकारक अनुभव असतो.
या परिसरात गोपीनाथ मंदिर एक धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेलं स्थळ आहे. शांत परिसर, पारंपरिक कोकणी स्थापत्य आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे हे मंदिर भक्तांबरोबरच पर्यटकांचंही लक्ष वेधून घेतं.
नेत्रावळी हे ठिकाण मडगावपासून साधारण ५० किमी अंतरावर आहे. खासगी वाहनांव्यतिरिक्त स्थानिक बसेसच्या माध्यमातूनही येथे पोहोचता येते.
पावसाळा म्हणजेच जून ते सप्टेंबर हा काळ नेत्रावळीच्या सौंदर्याचा खरा अनुभव घेण्याचा उत्तम काळ मानला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.