Honda E-Clutch Bike Dainik Gomantak
अर्थविश्व

Honda E-Clutch Bike: गिअर बदलण्याची झंझट संपली! होंडाची नवी ई-क्लच बाईक मार्केटमध्ये दाखल; किंमत व फीचर्स जाणून घ्या

e-clutch Bike Launch In India: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने त्यांच्या बहुप्रतिक्षित मिडलवेट सेगमेंटमधील दोन दमदार बाईक्स 2025 Honda CB650R आणि CBR650R भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केल्या आहेत.

Sameer Amunekar

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने त्यांच्या बहुप्रतिक्षित मिडलवेट सेगमेंटमधील दोन दमदार बाईक्स 2025 Honda CB650R आणि CBR650R भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या दोन्ही बाईक्स होंडाच्या ई-क्लच (E-Clutch) तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या देशातील पहिल्या बाईक्स ठरल्या आहेत.

या बाईक्ससाठी बुकिंग होंडाच्या बिगविंग डीलरशिप्स आणि अधिकृत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुरू झाले आहे. कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले की, डिलिव्हरी मे २०२५ च्या अखेरीस सुरू होणार आहे.

किंमत आणि इंजिन परफॉर्मन्स

2025 Honda CB650R ची एक्स-शोरूम किंमत 9.60 लाख रूपये, तर CBR650R ची किंमत 10.40 लाख रूपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही बाईक्समध्ये 649cc इनलाइन 4-सिलेंडर इंजिन देण्यात आले असून, ते 70bhp पॉवर आणि 63Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

होंडाचे ई-क्लच तंत्रज्ञान हे पारंपरिक क्लच लिव्हरशिवाय गिअर शिफ्टिंग करण्याची क्षमता देतं. यामुळे ट्रॅफिकमध्ये क्लच ऑपरेशनचा त्रास न घेता सहज गिअर बदलता येतात, शिवाय स्पोर्टी रायडिंग करताना अधिक नियंत्रण मिळते.

डिझाइन आणि वैशिष्ट्ये

CB650R हे बाईक निओ-स्पोर्ट्स कॅफे थीमवर आधारित आहे. यात गोल एलईडी हेडलॅम्प, मस्क्युलर इंधन टाकी आणि एक्स्पोज्ड स्टील फ्रेम आहे, जी त्याला एक रेट्रो पण मॉडर्न लूक देते.

दुसरीकडे, CBR650R ला फुल-फेअर बॉडी, एरोडायनॅमिक डिझाइन आणि स्पोर्ट्स बाईकसारखा लूक देण्यात आला आहे. दोन्ही बाईक्समध्ये एकसमान 5.0-इंचाचा TFT डिस्प्ले आहे, जो Honda RoadSync स्मार्ट कनेक्टिव्हिटीसह येतो.

रंग पर्याय

CB650R हे कँडी क्रोमोस्फीअर रेड आणि मॅट गनपाउडर ब्लॅक मेटॅलिक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे, तर CBR650R चे पर्याय ग्रँड प्रिक्स रेड आणि मॅट ब्लॅक मेटॅलिक असे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT