Goa News: कांदोळीच जनरल स्टोअर आगीत जळून खाक; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी मराठीमध्ये.
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

India Pakistan War: गुजरातमध्ये 15 मे पर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी

भारत-पाकिस्तान दरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणि राज्य सुरक्षा यंत्रणांनी दक्षता घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्यात 15 मे 2025 पर्यंत ड्रोन उडवण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

Candolim: कांदोळीच जनरल स्टोअर आगीत जळून खाक

येथील बँकेजवळ असलेल्या एका जनरल स्टोअरला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत जनरल स्टोअरसह शेजारील आणखी दोन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. प्राथमिक माहितीनुसार, आगीदरम्यान दुकानातील दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत दुकान मालक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

आम्ही दोन्ही भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसोबत मिळून शांततेसाठी कार्य करत आहोत असंही चीननं म्हटलं आहे. दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करण्याची प्रतिक्रिया चिनने केलीय.

Panjim: बॉम्बच्या धमकीबद्दल काळजी करण्याचे कारण नाही - उत्तर गोवा जिल्हाधिकारी

बॉम्ब निकामी पथक आणि पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, त्यांनी परिसरातील सर्व गोष्टींची पडताळणी केली. बॉम्बच्या धमकीबद्दल घाबरण्याचे आणि काळजी करण्याचे कारण नाही - यशस्विनी बी, उत्तर गोवा जिल्हाधिकारी

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वाल पुन्हा मुंबईकडून खेळणार

भारताचा कसोटी संघातील युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) कडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Panjim: उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या पणजी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या पणजी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल पणजी येथील उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला मिळाला. बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

Bus Accident: क्वीन नगर बस अपघात, आणखी एका प्रवाशाचा मृत्यू

क्वीन नगर येथे झालेल्या मिनी बस अपघातातील आणखी एक प्रवासी बिंद कुमार यादव यांचे जीएमसीमध्ये निधन झाले. अपघात गुरुवारी संध्याकाळी घडला होता.

भारताच्या प्रत्युत्तरानंतर PCBची पळापळ, 'या' देशात होणार सामने

पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने इतर देशात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित सामने आता पाकिस्तान ऐवजी दुबईमध्ये खेळवण्यात येतील.

Asif Munir: असीम मुनीरला पाकिस्तानच्या आर्मी चीफ पदावरुन हटवलं?

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा आर्मी चीफ असीम मुनीरला पदावरून काढल्याचं सांगितलं जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com