Modi government's biggest action against cyber crime Dainik Gomantak
अर्थविश्व

मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये! 15 दिवसांत 18 लाख सिम कार्ड बंद होणार; जाणून घ्या नेमकं कारण?

Cyber Fraud: मोदी सरकार फूल अ‍ॅक्शन मोड आले आहे. ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी सरकारने नवीन योजना बनवली आहे.

Manish Jadhav

Cyber Fraud: मोदी सरकार फूल अ‍ॅक्शन मोड आले आहे. ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी सरकारने नवीन योजना बनवली आहे. ज्या अंतर्गत सरकार येत्या 15 दिवसात जवळपास 18 लाख सिम आणि मोबाईल कनेक्शन बंद करणार आहे. सरकारकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि सिम कनेक्शन बंद करण्याची ही पहिलीच वेळ असेल. अशा परिस्थितीत, या 18 लाख मोबाइल कनेक्शनमध्ये तुमचा नंबर समाविष्ट आहे की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

दरम्यान, 9 मे रोजी दूरसंचार विभागाने Jio, Airtel आणि Vi सारख्या दूरसंचार कंपन्यांना 28,220 मोबाईल बँड बंद करण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय, सुमारे 20 लाख मोबाईल कनेक्शनची फेरतपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मोबाईल हँडसेटच्या माध्यमातून होणारी ऑनलाइन फसवणूक हे त्यामागचे कारण आहे.

या कारणामुळे सिम कार्ड बंद होतील

मोदी सरकारने देशातून सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणूकीला आळा घालण्यासाठी सिम कार्डवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत सरकारी आणि प्रायव्हेट एजन्सीच्या मदतीने ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवली जाणार आहे. रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपन्या मोबाईल कनेक्शन आणि सिम कार्ड पुन्हा सत्यापित करतील, त्यानंतर ते त्यांना ब्लॉक करु शकतात. येत्या 15 दिवसांत बनावट मोबाईल आणि सिम कार्डवर बंदी घालण्याचे काम दूरसंचार कंपन्यांना देण्यात आले आहे.

मोबाईल फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली

ईटीच्या रिपोर्टनुसार, देशात मोबाईलच्या माध्यमातून होणारे सायबर गुन्हे वेगाने वाढत आहेत. NCRP च्या मते, 2023 मध्ये डिजिटल आर्थिक फसवणुकीमुळे सुमारे 10,319 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. याप्रकरणी 694,000 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

अशी फसवणूक केली जात आहे

रिपोर्टनुसार, वेगवेगळ्या राज्यातील सिमचा वापर फसवणुकीसाठी केला जातो. गेल्या वर्षी सायबर फसवणुकीत गुंतलेली 37 हजार सिम कार्ड ब्लॉक करण्यात आली होती. या कालावधीत सुमारे 17 दशलक्ष मोबाईल (Mobile) कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. याशिवाय, 1,86,000 हँडसेट ब्लॉक करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT