PAN Card Dainik Gomantak
अर्थविश्व

PAN Card: पॅनकार्डधारकांना मोठा झटका, सरकारने जारी केली अधिसूचना!

Pan Card Update News: तुम्हीही पॅनकार्ड वापरत असाल तर त्यासाठी आवश्यक अधिसूचना सरकारने जारी केली आहे.

Manish Jadhav

Pan Card Latest News: पॅनकार्ड असलेल्या करोडो लोकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. तुम्हीही पॅनकार्ड वापरत असाल तर त्यासाठी आवश्यक अधिसूचना सरकारने जारी केली आहे.

अधिसूचनेनुसार, सरकार 13 कोटींहून अधिक लोकांचे पॅन कार्ड रद्द करु शकते. CBDT ने सांगितले आहे की, 61 कोटी पॅन कार्ड वापरकर्त्यांपैकी 48 कोटी लोकांनी ते त्यांच्या आधार कार्डशी लिंक केले आहे. त्याचवेळी, 13 कोटी लोकांनी अद्याप त्यांचे पॅन कार्ड (PAN Card) आधारशी लिंक केलेले नाही.

सीबीडीटीने माहिती दिली

माहिती देताना, सीबीडीटीने सांगितले की, 'जर 31 मार्चपर्यंत त्यांनी हे काम केले नाही, तर त्यांना व्यवसाय आणि कर संबंधित क्रियाकलापांमध्ये लाभ मिळू शकणार नाहीत.' केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, आतापर्यंत अनेक कोटी पॅन आधारशी जोडलेले नाहीत, परंतु हे काम 31 मार्च अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

पॅन कार्ड निरुपयोगी होईल

केंद्र सरकारने (Central Government) पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. यासाठी 31 मार्च 2023 ची अंतिम मुदत ठरवून, आधारशी लिंक नसलेले व्यक्तीगत पॅन या तारखेनंतर निष्क्रिय घोषित केले जातील, असे सांगण्यात आले आहे. यासोबतच सरकारने म्हटले आहे की, सध्यापासून 31 मार्चपर्यंत पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल.

कर लाभ मिळणार नाही

CBDT प्रमुखांनी म्हटले की, पॅनला आधारशी लिंक करण्याबाबत अनेक जागरुकता मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. आम्ही ही मुदत अनेक वेळा वाढवली आहे. जर आधार हे निर्धारित वेळेपर्यंत पॅनशी लिंक केले नाही, तर त्या धारकाला कर सवलती मिळू शकणार नाहीत, कारण त्याचा पॅन मार्चनंतर वैध राहणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

Vijayanagar Empire: राजा हरिहरच्या आदेशाने, बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकले; राजा अच्युतदेवरायाचा दुर्लक्षित इतिहास

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

SCROLL FOR NEXT