PAN Card Update: पॅन कार्ड धारकांसाठी सरकारने जारी केली महत्त्वाची माहिती! जाणून घ्या

PAN Card Latest News: आजच्या काळात पॅन कार्ड हे अनिवार्य डॉक्युमेंट बनले आहे.
PAN Card
PAN Card Dainik Gomantak

PAN Card Latest News: आजच्या काळात पॅन कार्ड हे अनिवार्य डॉक्युमेंट बनले आहे. त्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार होऊ शकत नाही. प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. बँकेपासून ते सरकारी कार्यालयापर्यंत कोणतेही आर्थिक काम तुम्ही त्याशिवाय करु शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की, पॅन कार्डशी संबंधित एखादी चूक तुमचे मोठे आर्थिक नुकसान करु शकते.

दोन पॅनकार्ड असले तरी दंड होईल

जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड (PAN Card) असतील तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. तुमचे बँक अकाऊंट (Bank Account) बंद होऊ शकते. याशिवाय तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे, जर तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील तर लगेच तुमचे दुसरे पॅनकार्ड संबंधित विभागाकडे सरेंडर करावे. आयकर कायदा (Income Tax Act) 1961 च्या कलम 272B मध्येही यासाठी तरतूद आहे. पॅन कार्ड कसे सरेंडर करु शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

PAN Card
Loan on PAN Card: पॅन कार्डवर किती वैयक्तिक कर्ज मिळणार, त्याच्या अटी काय आहेत?

दुसरे पॅन कार्ड कसे सरेंडर करायचे ते असे

  • पॅन सरेंडर करण्याची प्रक्रिया सोपी आहे. यासाठी एक सामान्य फॉर्म आहे, जो तुम्हाला भरावा लागेल.

  • यासाठी तुम्ही आयकर वेबसाइटवर जा.

  • आता 'नवीन पॅन कार्डसाठी विनंती किंवा/ आणि पॅन डेटामध्ये बदल किंवा सुधारणा' या लिंकवर क्लिक करा.

  • आता फॉर्म डाउनलोड करा.

  • आता फॉर्म भरल्यानंतर कोणत्याही NSDL कार्यालयात जाऊन सबमिट करा.

  • दुसरे पॅनकार्ड सरेंडर करताना ते फॉर्मसह सबमिट करा.

  • तुम्ही हे ऑनलाइन देखील करु शकता.

PAN Card
PF अकाऊंटशी PAN लिंक करा नाहीतर...

तसेच, एकाच पत्त्यावर एकाच व्यक्तीच्या नावाने येणारी दोन भिन्न पॅन कार्डे या श्रेणीत येतात. तुमच्याकडेही दोन पॅनकार्ड असतील तर एक सरेंडर करावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com