पावसाळ्यानंतर दसऱ्याच्या सुट्टीत गोव्याला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही काही खास ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकता. गोव्यात निसर्गरम्य किनारे, ऐतिहासिक किल्ले, सुंदर चर्च आणि शांत अभयारण्ये आहेत.
17व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला मांडवी नदीच्या मुखाशी आहे. किल्ल्यावरुन अरबी समुद्राचे आणि मांडवी नदीचे विहंगम दृश्य दिसते.
गोव्यातील सर्वात लोकप्रिय आणि खास करुन विदेशी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेला हा बीच त्याच्या 'फ्ली मार्केट'साठी (Flea Market) ओळखला जातो. हे मार्केट दर बुधवारी भरते. येथे तुम्ही खरेदीचा आनंद घेऊ शकता.
हा दक्षिण गोव्यातील एक शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. अर्धचंद्राकृती आकारामुळे हा किनारा पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. येथे तुम्ही निवांत वेळ घालवू शकता.
'से कॅथेड्रल' (Se Cathedral) आणि 'बॉम जिझस बॅसिलिका' यांसारख्या प्रसिद्ध चर्चमुळे 'ओल्ड गोवा'ला ऐतिहासिक महत्त्व आहे.
गोेवा कर्नाटक सीमेवर असलेला हा एक भव्य धबधबा आहे. याचे पाणी दुधासारखे दिसते, म्हणून त्याला 'दुधसागर' असे म्हणतात. ट्रेकिंग, जीप सफारी आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण खूप उत्तम आहे.
हे गोव्यातील सर्वात लहान वन्यजीव अभयारण्य आहे, जे निसर्ग आणि शांतता प्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहता येतात. लहान मुलांसाठी येथे प्राणीसंग्रहालय आणि पक्षीसंग्रहालय देखील आहे.
वागातोर समुद्रकिनाऱ्याजवळ असलेला हा किल्ला, 'दिल चाहता है' (Dil Chahta Hai) या चित्रपटाच्या शूटिंगमुळे खूप प्रसिद्ध झाला. किल्ल्यावरुन वागातोर समुद्रकिनारा आणि चापोरा नदीचे सुंदर दृश्य दिसते.
जर तुम्हाला रात्रीच्या मनोरंजनाचा आणि खेळांचा आनंद घ्यायचा असेल, तर गोव्यातील कॅसिनो खूप लोकप्रिय आहेत. मांडवी नदीवर तरंगणारे कॅसिनो (Floating Casinos) येथे खूप प्रसिद्ध आहेत.