NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

National Security Act Goa: राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत देशद्रोही कृत्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आरोपांशिवाय अटक करता येते.
Government Enforces National Security Act to Curb Criminal Activities
NSA Implemented in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना लक्षात घेता गोवा सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यात तीन महिन्यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना आता गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत देशद्रोही कृत्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आरोपांशिवाय अटक करता येते.

गेल्या काही महिन्यात राज्यात विविध घटना उघडकीस आल्या यानंतर दक्षिण आणि उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार बहाल करण्याची मागणी पोलिसांनी केली होती. दरम्यान, गृह खात्याच्या वतीने याबाबत आदेश जारी करण्यातत आले आहेत.

Government Enforces National Security Act to Curb Criminal Activities
बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

गृहखात्याचे अवर सचिव मंथन मनोज नाईक यांनी याबाबत आदेश जारी करण्यात आले आहे. राज्यात तीन महिन्यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, दोन्ही जिल्ह्याच्या (उत्तर, दक्षिण) जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळही स्थापन करण्यात आले आहे.

Government Enforces National Security Act to Curb Criminal Activities
गोव्यात आता प्राण्यांसाठी एक्स – रे , सोनोग्राफी सुविधा; सोनसोडो – राय येथे लवकरच सुरु होतोय पशु वैद्यकीय दवाखाना

दरम्यान, गोव्यात गेल्या दोन ते तीन महिन्यात विविध गुन्हेगारी घटना उघडकीस आल्या आहेत. यात मुंगुल येथील गँगवॉरसह सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला यांचा समावेश आहे.

मुंगुल येथील घटना प्रकरणात आजवर २८ जणांना अटक करण्यात आलीय. तर, रामा काणकोणकर प्रकरणात आठ जणांना अटक केलीये. यात गुंड जेनिटो कार्दोझ याचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com