कोल्हापूर गोवा मार्गावर दाजीपूर अभ्यारण्याजवळ हा प्राचीन गड उभा आहे.
या शिवगड किल्याची उभारणी फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी केली होती.
भारतातले जुने अभयारण्य दाजीपूरच्या हद्दीतच हा गड आहे.
हा गड म्हणजे एक महत्वाचे ठाणे आहे.
पुरातन काळी फोंडा घाटातून चालणाऱ्या व्यापारी दळणवळणावर इथून लक्ष दिले जात असे.
गडावर जुने अवशेष, तटबंदी, तसेच इथे असलेला गगनगिरी महाराजांचा मठ पाहता येतो.
कोल्हापूरपासून हे अंतर जवळपास ८५ किमी आहे.