Manish Jadhav
मध्य प्रदेशातील ओरछा किल्ल्याची बांधणी 16व्या शतकात बुंदेला राजा रुद्र प्रताप सिंह यांनी केली होती. बेतवा नदीच्या काठी असलेला हा किल्ला बुंदेला राजपुतांच्या शौर्याची आणि स्थापत्यशैलीची साक्ष देतो.
या किल्ल्यात राजपूत आणि मुघल स्थापत्यशैलीचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. किल्ल्यातील गुंतागुंतीची नक्षीकाम, उंच घुमट आणि भव्य कमानी पर्यटकांना थक्क करतात.
किल्ल्यातील 'राजा महल' हा सर्वात जुना विभाग आहे. येथील भिंतींवर हिंदू पौराणिक कथा, विशेषतः रामायण आणि महाभारतातील प्रसंगांची सुंदर चित्रे अजूनही सुस्थितीत आहेत.
मुघल सम्राट जहांगीरच्या स्वागतासाठी राजा वीरसिंह देव यांनी हा महल बांधला होता. हा महल त्याच्या भव्य चौक, बाल्कनी आणि हत्तींच्या कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे.
हा महल ओरछाचा राजा इंद्रजित सिंह यांची प्रसिद्ध कवयित्री आणि नर्तिका 'राय प्रवीण' हिच्यासाठी बांधला होता. या महलाची रचना आणि आसपासची बाग अतिशय सुंदर आहे.
किल्ल्याच्या परिसरामध्ये भव्य चतुर्भुज मंदिर आहे. तसेच, ओरछा हे जगातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे श्रीरामाला राजा म्हणून पुजले जाते आणि त्यांना लष्करी मानवंदना दिली जाते.
बेतवा नदीच्या काठावर बुंदेला राजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बांधलेल्या 14 भव्य 'छत्री' (स्मारके) आहेत. सूर्यास्ताच्या वेळी या छत्र्यांचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात अतिशय मनमोहक दिसते.
ओरछा किल्ल्याच्या इतिहासाची माहिती देण्यासाठी दररोज संध्याकाळी येथे 'लाईट अँड साऊंड' शो आयोजित केला जातो. यामुळे किल्ल्याचा इतिहास जिवंत झाल्याचा भास होतो.