अग्निकांडप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सौरथ लुथ्रा याला कोलवाळ कारागृहात सहकैद्यांकडून मारहाण झाल्याची चर्चा सकाळी रंगली होती. अखेर तसा काही प्रकार घडला नसून पाठदुखीच्या तक्रारीवरून त्याला नियमित तपासणीसाठी जिल्हा इस्पितळात आणावे लागले, असा खुलासा कारागृह प्रशासनाला करावा लागला. ‘हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लब’मधील अग्निकांड प्रकरणात संशयित लुथरा बंधू हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. शनिवारी सकाळी सौरभ याला कोलवाळ कारागृहात मारहाण झाली, अशी चर्चा सुरू झाली.
मात्र, त्यात तथ्य नाही असे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून स्पष्ट केल्यामुळे या विषयावर पडदा पडला. या प्रकरणातील संशयित सौरभ लुथराला शनिवारी (ता. ७ फेब्रुवारी), सकाळी म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात आणण्यात आले होते. पाठ आणि गुडघेदुखीचा त्रास जाणवत असल्याचे सौरभ याने सांगितल्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी कोलवाळ कारागृहातून इस्पितळात आणले होते.
मात्र, या विषयाला वेगळेच वळण लागले आणि मारहाणीची चर्चा रंगली. बर्च क्लब अग्निकांड प्रकरणात, सौरभ आणि गौरव हे दोघेही लुथरा बंधू सध्या कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या संशयितांना कारागृहात निवळ फरशीवर झोपावे लागत असल्याने सौरभने आपल्याला गुडघे व पाठदुखीचा त्रास जाणवत असल्याची तक्रार केली. त्यानुसार, नियमित वैद्यकीय तपासणीसाठी सौरभला शनिवारी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात आणले होते. तिथे एक्स-रे काढल्यानंतर सौरभला पुन्हा कारागृहात नेण्यात आले, असे सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.