Nashik Accident: धक्कादायक! नाशिकमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 6 चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू VIDEO

Nashik Accident News: नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली. दिंडोरी तालुक्यातील शिवाजी नगर भागात 3 एप्रिलच्या रात्री एक मारुती XL6 कार अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळली.

नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली. दिंडोरी तालुक्यातील शिवाजी नगर भागात 3 एप्रिलच्या रात्री एक मारुती XL6 कार अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये 6 निष्पाप बालकांचा समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदोर (ता. दिंडोरी) येथील दरगुडे कुटुंब एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री 10 च्या सुमारास घरी परतत असताना, शिवाजी नगर परिसरात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार वेगात असल्याने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या 'आशू राजे' यांच्या विहिरीत जाऊन कोसळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com