Laxmi Narayan Temple: न्हावेलीचे लक्ष्मीनारायण मंदिर पर्यटन स्थळ बनेल; पुनःप्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM on Laxmi Narayan Temple: न्हावेली, साखळी येथील श्री लक्ष्मीनारायण पंचायतन देवस्थानच्या नूतन मंदिर व मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा झाला.

साखळी: न्हावेली, साखळी येथील श्री लक्ष्मीनारायण पंचायतन देवस्थानच्या नूतन मंदिर व मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा झाला. प. पू. श्री. दत्तदास महाराज श्री छत्र, दत्तधाम पीठ, गोवर्धन (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली कलश रोहण करण्यात आले. तसेच इतर देवता मूर्ती पुनःप्राणप्रतिष्ठापनाही करण्यात आली.

या सोहळ्याला महाजन, ग्रामस्थ व अन्य भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी मंदिरात विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापना व शिखर कलश पुनःप्रतिष्ठापना झाल्यानंतर तत्वन्यास, महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, महाआरती, महागाऱ्हाणे, तीर्थप्रसाद व महाप्रसाद झाला.

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

या सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खास उपस्थिती लावली. गोव्यात काही ठिकाणी अनोख्या बनावटीची ऐतिहासिक मंदिरे आजही पाहायला मिळतात. गोव्यातील प्राचीन मंदिरांची ठेव ही गोव्याची ओळख असून न्हावेलीतील लक्ष्मीनारायण मंदिर पूर्णपणे पाषाणाने साकारण्यात आले आहे, हे कौतुकास्पद आहे. या मंदिरासाठी कोणत्याही प्रकारे सिमेंट, काँक्रीटचा वापर करण्यात आलेला नाही. या मंदिराचे काम, मंदिराचा आकर्षक डिझाइन व परिसराचे वैभव पाहता भविष्यात हे मंदिर पर्यटनाचे आकर्षण ठरणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ST Political Reservation
Pramod Sawant ST Reservation
Pramod Sawant Nitin Nabin Meeting
Double Engine Government Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com