Konkan Railway: गुटखा व तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या 464 जणांवर रेल्वे पोलिसांची कारवाई

Konkan Railway Fines: कोकण रेल्वेमार्गावरील स्वच्छता आणि प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत, रेल्वे पोलिसांनी तंबाखूजन्य पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या प्रवाशांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.

कोकण रेल्वेमार्गावरील स्वच्छता आणि प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत, रेल्वे पोलिसांनी तंबाखूजन्य पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या प्रवाशांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. २०२५ या चालू वर्षात ४६४ प्रवाशांवर कारवाई करत दंड आकारण्यात आला आहे. त्यांच्याकडून ४६ हजार ४०० रूपये वसूल करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी रेल्वे पोलिसांनी २ हडार ४४४ प्रवाशांवर कारवाई केली होती.

रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म, पादचारी पूल, स्टेशन परिसर, तसेच ट्रेनच्या आतमध्ये अनेक प्रवासी तंबाखू व गुटखा सेवन करून थुंकताना आढळून येतात. यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असून, स्वच्छतेवरही परिणाम होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com