Girish Chodankar on Ramakant Khalap: खलप यांना प्रचारासाठी पुरेसे स्वातंत्र्य दिले नाही

कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील कॉंग्रेस नेतृत्वामुळे उत्तर गोव्यात खलपांचा पराभव झाला.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्ही जागा आपण जिंकू असा दावा भाजपकडून करण्यात आला होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्यक्षात भाजपला केवळ उत्तर गोव्याचीच जागा जिंकता आली. इथे भाजपने श्रीपाद नाईक यांना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रमाकांत खलप यांच्याविरोधात रिंगणात उतरवले होते. मात्र खलप यांना उत्तर गोव्यात पराभवाचा सामना करावा लागला. याच पाश्वभूमीवर आता, कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील कॉंग्रेस नेतृत्वामुळे उत्तर गोव्यात खलपांचा पराभव झाला. खलपांना प्राचाराची मोकळीक मिळाली नाही. कॉंग्रेस नेतृत्व पक्ष पदाधिकाऱ्यांना आणि पक्ष कॅडरला प्रोत्साहन देण्यास अपयशी ठरले, असे चोडणकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com