Pariksha Pe Charcha: 'परीक्षा पे चर्चा'वेळी CM सावंतांचा विद्यार्थ्यांशी संवाद; Video

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परीक्षा पे चर्चा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परीक्षा पे चर्चा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशभरातील विद्यार्थ्यांना आभासी पद्धतीने ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मार्गदर्शन केले. काणकोण येथे एका कार्यक्रमासाठी आलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे व क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांनी शेळेर येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात हा कार्यक्रम सुरू असताना चुपचाप विद्यार्थ्यांसारखे बाकावर बसून पाहिला. यावेळी नगरसेवक हेमंत नाईक गांवकर, मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, सरचिटणीस दिवाकर पागी व अन्य उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी वार्तालाप केला. मोबाइलचा अतिवापर न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना त्यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com