बॉलिवूडमधील (Bollywood) 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) आज 70 वर्षांच्या झाल्या आहेत. 19 नोव्हेंबर 1951 रोजी मुंबईत जन्मलेल्या झीनत यांनी लहानपणापासूनच मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी झीनत यांनी 1970 मध्ये मिस एशिया पॅसिफिकचा किताब जिंकला होता. त्यानंतर 1971 मध्ये 'हस्टल' चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका मिळाली. झीनत यांच्या चित्रपट प्रवासाची कहाणी इथूनच सुरू झाली. चित्रपटांमध्ये प्रवेश केल्यानंतर झीनत यांनी त्यांच्या बोल्ड स्टाईलने आग लावली. पण त्याचवेळी त्या वादांनीही भरलेल्या होत्या. विवाहित पुरुषासोबतच्या अफेअरपासून ते शारिरीक शोषण आणि अनेक वादांमध्ये त्याचे नाव जोडले जात राहिले. झीनत यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या, त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी कायमची गेली.
गुपचूप केले लग्न
झीनत अमान आणि संजय खान यांचे अफेअर त्या काळात वर्तमानपत्र आणि मासिकांच्या मथळ्यात होते. संजयचे आधीच लग्न झाले होते, त्याला चार मुलेही आहेत. 'अब्दुल्ला' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनी एकमेकांशी लग्न केले होते. या गुप्त लग्नाचा खुलासा झाल्यावर सर्वांनाच धक्का बसला. लग्नापर्यंत सर्व काही ठीक चालले होते. मात्र त्यानंतर दोघांमध्ये रोज मारामारी सुरू झाली.
दृष्टी गमावली
संजय खान अनेकदा झीनत यांना मारहाण करायचा. एकदा त्याने झीनत यांना जाहीरपणे मारहाणही केली होती. एवढेच नाही तर मारहाणीमुळे एका डोळ्याची दृष्टीही गेली आहे.
पहिल्या पत्नीसमोर मारहाण केली
संजयने झीनत यांना एका चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावले होते. पण गोष्टी बिघडल्या. जेव्हा संजयने झीनत यांना मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा संजयची पहिली पत्नी जरीन खानही तिथे उपस्थित होती.
झीनत यांचे चित्रपट
जीनम अमान हरे रामा हरे कृष्णा, यादों की बारात, रोटी कपडा और मकान, अजनबी, डॉन, धरम वीर, धुंध, बलिदान, इंसाफ का तराजू, पुकार, दोस्ताना, डार्लिंग डार्लिंग, हम किसी से कम नहीं, लावारिस और चोरी मेरा काम या चित्रपटांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.