TV Actress Suicide: स्टार प्लस या वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये संजना ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री वैशाली टक्कर (वय 30) हीने आत्महत्या केली. इंदुरमधील राहत्या घरात तिने गळफास घेतला.
वैशालीच्या मृतदेहाजवळच सुसाईड नोटदेखील सापडली आहे. प्राथमिक तपासात प्रेम प्रकरणातून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनीही त्या दिशेने तपास सुरू केला आहे. तथापि, सुसाईट नोटमध्ये काय लिहिले आहे, हे पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही. वैशाली ही उज्जैनच्या महिदपूर येथील रहिवासी आहे. ती गेल्या वर्षभरापासून इंदूरमध्ये राहत होती. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठवला आहे.
वैशालीने गेल्या वर्षी २६ एप्रिल रोजी केनियातील डेंटिस्ट डॉ. अभिनंन याच्याशी साखरपुडा केला होता. कुटूंबातील ठराविक लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता. दोघेही जून २०२१ मध्ये लग्न करणार होते. पण महिनभरानंतर त्यांनी कोरोनामुळे लग्न पुढे ढकलले होते. जेव्हा स्थिती चांगली होईल, तेव्हा लग्न करू, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.
स्टार प्लसवरील मालिकेने मिळाली लोकप्रियता
स्टार प्लसवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून वैशालीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरवात केली होती. ती या मालिकेत संजना ही व्यक्तिरेखा साकारत होती. 2015 ते 2016 या काळात ती या मालिकेत कार्यरत होती. त्यानंतर तिने ये वादा रहा, ये है आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर्स, लाल इश्क आणि विष या अमृत, मनमोहीनी 2 या टीव्ही मालिका आणि शोज केले होते. ससुराल सिमर का 2 मधील निगेटिव्ह भूमिकेसाठी तिला पुरस्कारही मिळाला होता.
यापुर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत, अभिनेत्री जिया खान, आसिफ बसरा, कुशल पंजाबी, प्रत्यूषा बॅनर्जी यांनी आत्महत्या केली होती. याशिवाय सिद्धार्थ शुक्ला च्या मृत्यूनेही अनेकांना धक्का बसला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.