Shahrukh-Kajol : शाहरुख- काजोलचा 'डीडीएलजे' पुन्हा पडद्यावर,व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल

शाहरुख-काजोलचा ब्लॉकबस्टर असलेला चित्रपट डीडीएलजे पुन्हा एकदा रिलीज करण्यात आला आहे
DDLJ
Shah Rukh Khan
DDLJ Shah Rukh Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चाललेल्या चित्रपटांपैकी एक आहे. ऑल-टाइम ब्लॉकबस्टरने शाहरुख खान आणि काजोल यांना देशातील सुपरस्टार बनवले आणि फिल्म इंडस्ट्रीचा एक हुकमी चेहरा म्हणुनदेखील हे दोन सेलिब्रिटी . 

DDLJ ने पिढ्यानपिढ्या भारत आणि भारतीयांसाठी पॉप संस्कृतीला आकार दिला. या वर्षी, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने, डीडीएलजे संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात रिलीज होणार आहे, यशराज फिल्म्सने याची अधिकृत माहिती दिली आहे. चित्रपट क्षेत्रातले तज्ज्ञ तरन आदर्श यांनी याची ट्विट्टरवरून माहिती दिली .

ज्यांना पुन्हा या बेस्ट फिल्मचा व्हिज्युअल अनुभव घेण्याच इच्छा आहे त्यांच्यासाठी - DDLJ मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, गुडगाव, फरीदाबाद, लखनौ, नोएडा, डेहराडून, दिल्ली, चंदीगड, कोलकाता, गुवाहाटी यासह भारतातील ३७ शहरांमध्ये प्रदर्शित केला जाईल. , बेंगळुरू, हैदराबाद, इंदूर, चेन्नई, वेल्लोर, त्रिवेंद्रम या शहरांमध्येही डीडीएलजे प्रदर्शित केला जाणार आहे.

देशातल्या मोठ्या शहरात डीडीएलजे रिलीज होणार आहे आणि तोही व्हॅलेंटाईन डे सारख्या प्रेमाचा उत्सव सुरू असताना. अभिनेता शाहरुख खानने गेली 30 वर्षे देशातल्या तरुणाईला प्रेम करायला शिकवले आहे. पठान चित्रपटाला इतका विरोध होत असतानाही पठानला मिळालेलं यश बघता फॅन्सवर शाहरुखचा जलवा अजुनही असल्याचं सिद्ध केलं आहे.

प्रेम रोमान्स आणि शाहरुख हे समीकरण गेली 30 वर्षे भारतातल्या तरुणाईने पाहिलं आहे. आजही रोमान्स आणि प्रेम म्हटलं की शाहरुखचा डीडीएलजे आजही आठवतोच. त्यामुळे साहजिकच शाहरुखने शिकवलेलं प्रेम भारतातल्या आणि जगभरातल्या प्रेमी युगूलांसाठी शाहरुख खान हाच एक मोठा लव्हगुरू आहे. त्यामुळे हा व्हॅलेंटाईन वीक डीडीएलजे सोबत रंगणार हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com