आज जागतिक रंगभूमी दिवस कलेच्या अनेक प्रकारांना उदरात घेऊन सगळ जग कवेत घेण्याची ताकद नाटकात असते. प्रोसिनियमच्या त्या चौकटीत कलाकार एका विलक्षण विश्वात नेऊन प्रेक्षकांना कथेचा भाग बनवतात. नाटक जगणं समृद्ध करतं कलाकारांचं आणि प्रेक्षकांचंही. चित्रपटात गेलेला नाटकाचा कलाकार आपली एक वेगळी छाप सोडतो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा... नाटकाचं शिक्षण देणारी एक महत्त्वाची संस्था
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) भारतातील अग्रगण्य थिएटर इन्स्टिट्यूटने नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, पंकज कपूर आणि इरफान खान यांच्यासह उद्योगातील काही उत्कृष्ट कलाकार निर्मिती केली आहे.
नसिरुद्दीन शाह
आपल्या दमदार आणि वास्तववादी अभिनयाने प्रेक्षकांना एका विलक्षण पात्राचा अनुभव देणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकले आहेत. अब्राहम अल्काझी यांच्यासारख्या एका कसलेल्या शिक्षकाकडे आणि पं.सत्यदेव दुबे यांच्या तालमीत तयार झालेले नसीरजी नंतर चित्रपटांकडे वळले. त्यांनी आक्रोश, मंथन, चक्र, मिर्च मसाला यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांना दर्जेदार कलाकृतीची अनुभूती दिली.
रघुवीर यादव
रघुबीर यादव यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनेता, संगीतकार आणि कॉस्च्युम डिझायनर म्हणून 13 वर्षांपेक्षा जास्त काळ घालवला, 15 व्या वर्षी घरातून पळून गेल्यानंतर ते पारशी थिएटरचा एक भाग झाले.
ओम पूरी
अभिनेते ओम पूरी नसीरजींचे जवळचे मित्र. दोघांनी NSD आणि FTII मध्ये एकत्रच शिक्षण घेतले. आक्रोश चित्रपटात एकही शब्द न बोलता ओम पूरींनी केलेला अभिनय एक मैलाचा दगड म्हणावा असा चित्रपट देऊन गेला. ओम पूरींनी अर्धसत्य, आक्रोश,तमस, मकबूल या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना अंतर्मुख केलं. शाम बेनेगल यांच्या भारत एक खोजमध्ये त्यांनी केलेली औरंगजेबाची भूमीका प्रचंड गाजली होती. नंतरच्या काळात ओम पूरींनी विनोदी भूमींकामधुनही काम केले.
आशुतोष राणा
एनएसडीचे माजी विद्यार्थी आणि पंडित सत्यदेव दुबे यांचा विद्यार्थी म्हणजेच आशूतोष राणा. 'स्वाभिमान' (1995) आणि 'दुष्मन' (1998) आणि 'संघर्ष' या चित्रपटांमधून त्यांनी आपली एक वेगळी वाट निवडली होती. मोठ्या पडद्यावर येण्यापूर्वी हा अभिनेता पृथ्वी थिएटरमध्ये एक मोठे आकर्षण होता.
पियूष मिश्रा
जेव्हा पियुष मिश्रा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी होते, तेव्हा त्यांना कल्पना नव्हती की त्याची कारकीर्द किती बहुआयामी असेल. 80 च्या दशकाच्या सुरुवातीस आणि रंगमंचावर 'हॅम्लेट' नाटकापासुन सुरूवात केली. करिअरच्या सुरूवातीला त्यांनी 'फिरदौस' आणि 'कभी दूर कभी पास' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले.
पंकज कपूर
बिहारच्या बेलसांड गावात पंकज कपूर यांनी अभिनयाचा पहिला ब्रश अनुभवला. हौशी नाटकांमध्ये त्यांनी अनेकदा मुलीच्या भूमिका केल्या. इयत्ता 12 मधील 'आंधा कुआं' या नाटकाने त्याच्यामध्ये अभिनयाची आवड निर्माण केली आणि पुढच्या काही वर्षांत त्याने आपला वेळ हॉटेलचे किचन आणि थिएटरमध्ये घालवला. अलिकडेच
संजय मिश्रा
'आँखों देखी', 'मसान', 'वध', 'अनारकली ऑफ आरा', 'कामयाब' आणि इतर अनेक चित्रपटांसह आजच्या स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांचे आवडते बनण्यापूर्वी संजय मिश्रा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी होते. केवळ विनोदी अभिनेताच नाही तर गंभीर भूमीकांमधून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
इरफान खान
दिवंगत अभिनेता इरफान खानही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी. अभिनयात डोळ्यांचा नेमका वापर करणारे मोजके अभिनेते आहेत त्यापैकी एक म्हणजे इरफान खान. मकबूल, पान सिंह तोमर, मदारी, रोग यांसारख्या चित्रपटातून त्यांनी आपली एक वेगळीच शैली दाखवून दिली आहे. सुरूवातीला नाटक शिकलेला इरफान खान चित्रपटात रमला आणि अगदी त्याचा प्रवास आंतरराष्ट्रीय चित्रपटांपाशी जाऊन थांबला..
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.