Pathaan: पठाण चित्रपटातील बेशरम गाणे प्रसिद्ध झाल्यापासून पठाण चित्रपटावरुन संपूर्ण देशात वाद सुरु होता. काही राज्यात पठाण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. काही ठिकाणी शाहरुख खानचे पोस्टरही जाळण्यात आले आहेत. मात्र मोठ्या वादविवादानंतर पठाण आज प्रदर्शित झाला आहे. आता पठाण चित्रपट प्रदर्शनावरुन मनसेने मोठे वक्तव्य केले आहे.
शाहरुख खानच्या चित्रपटासाठी मराठी चित्रपटांवर अन्याय का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. शाहरुखच्या कमबॅकसाठी 'बांबू' आणि 'पिकोलो' सारख्या मराठी चित्रपटांचा बळी का ? पठाणसाठी मराठी चित्रपटांचा का बळी दिला जातोय हे समजण्यापलिकडे आहे. शाहरुख खानचा( Shahrukh Khan ) कमबॅक आहे, तुम्ही पठाण चित्रपट दाखवा मात्र त्यासाठी मराठी चित्रपटांवर अन्याय करु नका.
महाराष्ट्रा( Maharashtra )त मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळू नये ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. मल्टीफ्लेक्स मालकांनी सांमजस्याची भूमिका घ्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करु असा इशारा मनसेच्या चित्रपटसंघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
दरम्यान, पठाणचे पहिले गाणे प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाने सिनेप्रमींच्या मनात उत्सुकता निर्णाण केली होती. शाहरुखचे चाहते शाहरुख जवळजवळ चार वर्षानंतर कमबॅक करत असल्याने हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट बघत होते. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आपला आनंद व्यक्त करत आहेत. मात्र काही ठिकाणी बजरंग दलाकडून चित्रपटाचे पोस्टर जाळण्यात आले आहेत. आता पठाण बॉक्सऑफीसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.