सैफ अली खानने 10 वर्षांनी लहान असलेल्या बेबोशी का केलं लग्न, स्वतः केला खुलासा

सैफ अली खानची (Saif Ali Khan) लव्ह लाइफ बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या विषयांपैकी एक आहे.
Why Saif Ali Khan married Kareena Kapoor
Why Saif Ali Khan married Kareena Kapoor Dainik Gomantak
Published on
Updated on

सैफ अली खानची (Saif Ali Khan) लव्ह लाइफ बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या विषयांपैकी एक आहे. सैफचे पहिले लग्न बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अमृता सिंगसोबत (Amrita Singh) झाले. दोघांचे लग्न 13 वर्षे टिकले आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. सैफ-अमृताचे लग्न का तुटले याबाबत नेहमीच अनेक तर्क लावले जात होते. त्यांच्या ब्रेकअपचे सर्वात मोठे कारण त्यांच्यातील वयाचे अंतर मानले गेले.

Why Saif Ali Khan married Kareena Kapoor
उर्वशी रौतेलाने तब्बल 40 लाखाचा घातला गाऊन, पाहा व्हिडिओ

जेव्हा सैफने अमृताशी लग्न केले, तेव्हा तो फक्त 20 वर्षांचा होता, तर अमृता 32 वर्षांची होती. अशाप्रकारे, दोघांच्या वयात 12 वर्षांचे अंतर होते. अमृता सैफपेक्षा खूप मोठी होती, त्यामुळे दोघांना जुळवता आले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. मात्र, अमृताला घटस्फोट दिल्यानंतर सैफने 10 वर्षे लहान करीना कपूरला आपला साथीदार म्हणून निवडले आणि तिला आपली दुसरी पत्नी बनवले. करीनाशी लग्न केल्यानंतर सैफने कमी वयातील करीनाशी लग्न केल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. एवढेच नाही तर सैफने बाकीच्या पुरुषांना त्याच्यापेक्षा लहान मुलीशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता.

Saif Ali Khan and Amrita Singh
Saif Ali Khan and Amrita SinghDainik Gomantak

सैफ म्हणाला होता, मला असे म्हणायचे आहे की मुलांनी स्वतःपेक्षा लहान मुलीशी लग्न करावे कारण सुंदर, निर्णायक आणि मजेदार प्रेमळ व्यक्तीशी लग्न करणे चांगले असते. करीनामध्ये हे तिन्ही गुण आहेत. तुम्हाला सांगू की करीना आणि सैफने 2012 मध्ये लग्न केले. लग्नानंतर करीनाने 2016 मध्ये एका मुलाला जन्म दिला ज्याचे नाव तैमूर अली खान आहे. यानंतर, 2021 मध्ये तिने जहांगीर अली खान नावाच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला.

Saif Ali Khan and Kareena Kapoor
Saif Ali Khan and Kareena KapoorDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com