Goa: मल्लिका साराभाईंना मोदींचा राग का येतो?

मल्लिका साराभाई (Mallika Sarabhai) म्हणतात, मी सतत लढा देणार; तत्त्वांची पाठराखण करणार
Dancer Mallika Sarabhai
Dancer Mallika SarabhaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : मल्लिका साराभाई (Mallika Sarabhai) यांच्या नावातच लढवय्येपणा पुरेपूर मुरला आहे. त्या जागतिक कीर्तीच्या नृत्यांगना (Dancer) तर आहेतच, परंतु चित्रपट, नाट्य क्षेत्रातही (Film industry) त्यांचा वावर आहे, परंतु त्यालाही आता राजकीय लढवय्येपणाची जोड देत देशातील आघाडीच्या मोदी विरोधक म्हणून त्यांनी आपली प्रतिमा तयार केली आहे. उजव्या विचारसरणीच्या विरोधात प्रखरपणे बोलणाऱ्या देशातील प्रमुख विचारवंतांमध्ये त्या आघाडीवर आहेत. आजही दै. ‘गोमन्तक’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उजव्या विचारसरणीने देशात घातलेला हैदोस देशाची प्रतिमा आणि तत्त्वे बदलण्यासाठी या शक्तींचा चाललेला आटापिटा आणि लोकशाहीच्या विद्‍ध्वंसासाठी चाललेले हेतुपुरस्सर प्रयत्न यांचा त्यांनी कडक समाचार घेतला.(Why is Mallika Sarabhai angry with Modi)

त्या म्हणाल्या, भारताची बहुढंगी इंद्रधनुष्यीय प्रतिमा बदलण्याच्या राजकीय प्रवृत्तीला शह देण्यासाठी देशातील जनतेने सतत संघर्ष केला पाहिजे. हा लढा अविरतपणे चालविण्याची गरज आहे. ‘प्रधानमंत्री मोदी (Narendra Modi) यांनी देशाची रचना व पायाच नेस्तनाबूत करण्याचा पण केला आहे.

Dancer Mallika Sarabhai
तारक मेहता... 'मधील सोनूचा 'हा' व्हिडिओ पाहिला का ?

सृजनशील उपक्रम...

जगातील महिला नाट्यकर्मींच्या महासंघाने तीन महिन्यांचा एक अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरविले असून त्यात भारताच्या प्रतिनिधी म्हणून मल्लिका साराभाई काम करणार आहेत. पॅलेस्टिन - लेबनन, व्हेनेझुएला व भारतात हे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. भारतामध्ये रंजल्यागांजल्या आणि पीडित वर्गावरील अत्याचार आणि वेदनांचे चित्रण करणारे पाच मिनिटांचे व्हिडिओ बनवून ते झूम माध्यमाद्वारे प्रसारित केले जाणार आहेत. जगभरच्या महिलांची आक्रंदने आणि त्यांच्या वेदनाही टिपण्याचा त्यात प्रयत्न असेल. या वेदनांना जागतिक आकार मिळवून देण्याचा प्रयत्न त्याद्वारे केला जाणार आहे, असे साराभाई यांनी सांगितले.

‘अशाही धमक्या येतात...’

मी पोटतिडकीने बोलते. त्याचा प्रतिकार सतत होतो आणि मला ट्रोल केले जाते. मला शिव्याशाप देणारे आणि बलात्कार करण्याची धमकी देणारेही संदेश येतात, परंतु या प्रत्येक संदेशाला मी उत्तर देते. मी त्यांना प्रश्न करते, तुमच्या आया बहिणींना उद्देशून जर कोणी असे अभद्र बोलले तर तुम्हाला चालेल काय? त्यांच्याशी असा मनमोकळा संवाद केल्यानंतर त्यातील 50 - 60 टक्के तरी लोक माझी माफी मागतात, असा मला अनुभव आहे. अशा प्रवृत्तींना सरळ भिडणे हाच उपाय आहे असे मला वाटते, असेही साराभाई म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com