रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल सुसाट, खास प्रेक्षकांच्या आग्रहास्तव चित्रपटाचे शोज वाढवणार

अभिनेता रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच गारुड घातल्याचे दिसून येत आहे.
Animal Movie extra shows
Animal Movie extra showsDainik Gomantak
Published on
Updated on

Ranbir Kapoor's Animal extra shows in theater : अभिनेता रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल चित्रपट सध्या चाहत्यांमध्ये कमालीची क्रेज निर्माण करताना दिसत आहे. थिएटर्सपासून सोशल मिडीयापर्यंत या चित्रपटाने मोठी जादू केल्याचे दिसत आहे. जगभरातल्या 4 हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट सुरु असताना आता प्रेक्षकांच्या मागणीनुसार चित्रपटाचे शोज वाढविण्यात येणार आहेत. चला पाहुया यासंदर्भातले सविस्तर वृत्त.

अ‍ॅनिमलचा धुमाकूळ

रणबीर कपूरचा ' अ‍ॅनिमल' चित्रपट थिएटरमध्ये चांगलाच धूमाकूळ आहे. लोक हा चित्रपट खूप एन्जॉय करत आहेत. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांमध्ये याविषयी बरीच चर्चा झाली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याला खूप पसंती मिळाली. 

या चित्रपटाने पाच दिवसांत 282.96 कोटींचा व्यवसाय केला आहे. लवकरच हा चित्रपट 300 कोटींचा टप्पा पार करेल. आता आलेली बातमी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. या चित्रपटाचे शो वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रेक्षकांची मागणी

लेट नाईट शोसाठी सिनेमाचे मालक प्रेक्षकांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत आणि पहाटे 5:30 पर्यंत मॉर्निंग शोसह हा चित्रपट 24×7 चालविण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

डे आणि नाईटचे शो

मुंबईतील सिनेमागृहांमध्ये पहाटे 1 आणि पहाटे 2 च्या लेट नाईट शो व्यतिरिक्त पहाटे 5.30 चे शो देखील सुरू करण्यात येत आहेत. तर PVR ओबेरॉय मॉल आणि PVR सिटी मॉलमध्ये सकाळी 12:30 आणि 1:05 वाजताचे शो जोडले जात आहेत. त्याच वेळी, दिल्ली आणि हैदराबादमध्ये 11 आणि 11:40 वाजता शो सुरू होत आहेत, जे लवकर भरले जात आहेत.

Animal Movie extra shows
रश्मिका, आलियानंतर आता प्रियांकाला मनस्ताप... डीपफेक व्हिडीओ व्हायरल

अ‍ॅनिमलचं कलेक्शन

अ‍ॅनिमलच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जगभरात ४८१ कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटात पिता-पुत्र रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांची कथा दाखवण्यात आली आहे. 100 कोटींचा हा चित्रपट 4000 स्क्रीन्सवर रिलीज झाला असून आतापर्यंत कमाईच्या बाबतीत 'जवान' नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. चित्रपटाचा रनटाइम 3 तास 21 मिनिटे आहे.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com