Vivek Agnihotri : "शाहरुख खान आणि करन जोहरने भारताची संस्कृती बिघडवली" विवेक अग्नीहोत्री नेमकं काय म्हणाले?

Vivek Agnihotri on Shahrukh - Karan: द कश्मिर फाईल्स फेम दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी आता शाहरुख खान आणि करन जोहरवर निशाणा साधला आहे, ते नेमकं काय म्हणाले? चला जाणून घेऊया...
Vivek Agnihotri
Vivek AgnihotriDainik Gomantak
Published on
Updated on

आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे द कश्मिर फाईल्स फेम दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

नुकताच विवेक अग्निहोत्रीने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि चित्रपट निर्माता करण जोहरवर निशाणा साधला आहे. 

शाहरुख आणि करन जोहर या दोघांच्या सिनेमाने देशाची संस्कृती आणि संस्कार उद्ध्वस्त केल्याचे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे . यासोबतच त्यांनी डाव्या विचारसरणीवरही भाष्य केले आहे.

सतत वादग्रस्त विधानं

'द काश्मीर फाइल्स'नंतर 'द व्हॅक्सिन वॉर'मुळे चर्चेत आलेले विवेक अग्निहोत्री सतत काही ना काही वादग्रस्त वक्तव्ये देत असतात. कधी चित्रपटांबद्दल तर कधी इंडस्ट्रीतील लोकांबद्दल ते आपले मत मांडत असतो. यामुळे त्यांच्यावर टीका होत असली तरी विवेक अग्नीहोत्री आपल्या विधानावर ठाम असतात . 

मी लोकांची पर्वा करत नाही

एका मुलाखतीत, दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री म्हणाले की लोक काय म्हणतात याची मला अजिबात पर्वा नाही. याच मुलाखतीत त्यांनी अभिनेता शाहरुख खान आणि दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटांवरही निशाणा साधला आहे. आपल्या सिनेमामुळे देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीचे खूप नुकसान झाल्याचे ते म्हणाले.

आपल्या कमेंट्सबद्दल विवेक अग्नीहोत्री म्हणाले

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांना ऑस्करसाठी केलेल्या जुन्या ट्विटमुळे लोकांचे टोमणे ऐकावे लागले आहेत. त्यांच्या जुन्या कमेंट्सवरुन सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होत आहे. यावर अग्निहोत्री म्हणतात , 'जो कोणी जुन्या ट्विटवर टोमणा मारतो आणि म्हणतो की तुम्ही हे 10 वर्षांपूर्वी बोलला होता. 

मला त्या लोकांसाठी चॉकलेटचे पॅकेट पाठवायचे आहे. मला त्यांचे आभार मानायचे आहेत. याचा अर्थ मी बदलत आहे. 2024 आणि 2025 मध्ये जेव्हा तुम्ही मला दिल्लीच्या फाइल्ससाठी भेटलात तेव्हा तुम्हाला लाज वाटली आणि मी अजूनही तेच बोलतोय. 

पुढे बोलताना विवेक अग्नीहोत्री म्हणाले

मी जगू शकत नाही जिथे मी रोज बदलू शकत नाही. प्रत्येक दिवस हा बदलासह नवीन दिवस असतो. मला स्थिर जीवन जगायचे नाही. त्यामुळे, लोकांना माझे ट्विट सापडणे ही चांगली गोष्ट आहे आणि अशा जुन्या पोस्ट्स शोधणाऱ्या तथ्य तपासणाऱ्यांचे मी आभार मानू इच्छितो.

डाव्या विचारसरणीच्या व्यक्तीसारखाच जगलो...

आपल्या विचारसरणीत हा बदल कशामुळे झाला याबद्दल बोलताना विवेक अग्निहोत्री डाव्या विचारांबद्दल आपले मत मांडतात आणि म्हणतात, 'माझे आयुष्य बदलले कारण मी बराच काळ डाव्या विचारसरणीच्या व्यक्तीसारखाच जगलो. पण जेव्हा तुम्हाला मुलं होतात तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतात. 

डाव्या विचाराबद्दलचं मत

मला वाटायचं की ही मुलं मोठी झाल्यावर भारतातून काय शिकतील. तेव्हा मला जाणवले की आपण जगातल्या महान तत्त्वज्ञानी देशातून आलो आहोत. त्यामुळेच आपण अनेक दशके टिकून आहोत. 

पण डाव्या विचारसरणीमुळे तुम्हाला देशाबद्दलच्या प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार वाटू लागतो. जगात कुठेही गेलो तरी मला सगळ्याचा तिरस्कार वाटत होता. पण मी ठरवले की हीच वेळ आहे जमिनीवर राहण्याची, खरं राहण्याची. या गोष्टींमुळे मी बदललो.

दृष्टिकोन खूप बदलला

विवेक अग्नीहोत्रींनी पुढे सांगितले की त्या बदलामुळे सिनेमाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही खूप बदलला. 'चॉकलेट' आणि 'धना धन गोल' बनवणारा माणूस पूर्णपणे हार्ड हिटिंग ड्रामाकडे वळला आहे. मी अनुभव आणि वयानुसार बदलले. विशेषत: जेव्हा मी भारताच्या दौऱ्यावर गेलो तेव्हा मला खरा देश दिसला. 

तो भारत मला परिचित नव्हता असे नाही पण एक चित्रपट निर्माता म्हणून मी तो पहिल्यांदाच पाहिला. माझ्या लक्षात आले की अशा अनेक कथा आहेत ज्या आजपर्यंत कोणीही सांगितल्या नाहीत आणि हा देशातील चित्रपट निर्मात्यांनी केलेला सर्वात मोठा गुन्हा आहे.

Vivek Agnihotri
Fardeen khan Viral Photo : त्याच्या जाड असण्यावर खूपच खिल्ली उडवली ;पण बीचवरचा फोटो शेअर करताच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या...

शाहरुख आणि करनच्या चित्रपटांनी देशाच्या संस्कृतीची वाट लावली !

चित्रपट निर्मात्यांनी भारतीय कथांना कसे संकुचित केले याबद्दलही ते बोलले. विवेक अग्निहोत्रीने करण जोहर आणि शाहरुख खानच्या सिनेमाच्या ब्रँडला विशेष नापसंत केली. ते म्हणाले, 'दीवारपासून नाही तर शहेनशाह, अमिताभ बच्चन सुपरस्टार म्हणून आल्यानंतर सिनेमाने कधीही खऱ्या गोष्टी सांगितल्या नाहीत. 

विशेषत: करण जोहर आणि शाहरुख खानच्या चित्रपटांमुळे भारत देशाच्या संस्कृतीचे आणि मूल्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे खऱ्या, प्रामाणिक गोष्टी सांगणे मला महत्त्वाचे वाटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com