Vijay Varma Career and Struggle : नाटकापासुन सुरूवात, पुण्यात शिक्षण... विजय वर्माचा अभिनयाचा प्रवास कसा झाला?

अभिनेता विजय वर्मा गेल्या काही दिवसांपासुन सोशल मिडीयावर सतत चर्चेत आहे. चला जाणुन घेऊया विजय वर्माबद्दलच्या या माहित नसलेल्या गोष्टी.
Vijay Varma Career and Struggle
Vijay Varma Career and StruggleDainik Gomantak
Published on
Updated on

अभिनेता विजय वर्मा गेल्या काही दिवसांपासुन सतत चर्चेत आहे. वेब सिरीजमधल्या त्याच्या अभिनयाच्या शैलीपासुन ते तमन्नासोबतच्या अफेअरपर्यंत विजय वर्मा सोशल मिडीयावर नेटीझन्सच्या नजरेत आला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तमन्नाने विजयसोबतच्या नात्यावर मौन सोडले आहे.

विजय तिच्यासाठी स्पेशल असल्याचेच तिने या मुलाखतीत सांगितलं आहे. विजय वर्मा सध्या चर्चेत असला तरी मेनस्ट्रीम मूव्हीजमध्ये तमन्नाचं नाव जितकं फेममध्ये आहे तितकं विजयचं नाही. चला तर जाणुन घेऊया तमन्नाच्या या राजकुमाराबद्दल, त्याच्या करिअर आणि स्ट्रगलबद्दल.

विजयचा जन्म

विजय वर्मा हा मुख्यतः हिंदी फिल्म इंडस्ट्रीत काम करणारा अभिनेता आहे. त्यांचा जन्म 29 मार्च 1986 रोजी हैदराबाद, तेलंगणा येथे झाला. विजयच्या प्रवासाची सुरुवात रंगभूमीपासून झाली आणि त्यांने आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग नाटक शिकण्यासाठी दिला आहे.

कुठल्याही कसलेल्या कलाकाराची सुरूवात ही नाटकापासुन झालेली असते, हा नियम नसला तरी बऱ्याच मातब्बर अभिनेत्यांना पाहुन आपण याची कल्पना करु शकते. नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, इरफान खान ही त्याची काही उदाहरणं. विजय वर्माचा अभिनय बघता त्याच्यातली अभिनयाची समज नाटकातून आली आहे हे सहज समजतं. विजयचा सहजसुंदर अभिनय प्रेक्षकांनाही भावतो.

FTII मध्ये शिक्षण

विजय वर्माने आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हैदराबाद येथे पूर्ण केले. त्यानंतर त्याने हैदराबादमधील महाविद्यालयातून बीकॉमची पदवी घेतली.

2005 मध्ये विजय वर्माने पुण्याच्या प्रतिष्ठित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये अर्ज केला आणि विजयचं सिलेक्शन झालं. एफटीआयआयमध्येच विजयने अभिनयात पदवी पूर्ण केली.

विजय वर्माचे कुटूंब

विजयच्या वडिलांचा हैदराबादमध्ये हस्तकला व्यवसाय आहे, परंतु त्यांच्या आईबद्दल मर्यादित माहिती उपलब्ध आहे. त्याला दोन मोठी भावंडे आहेत - मनोज वर्मा नावाचा मोठा भाऊ आणि शोभा नावाची मोठी बहीण.

Vijay Varma
Vijay VarmaDainik Gomantak

अभिनयापूर्वी अनेक ठिकाणी नोकऱ्या

विजय वर्माने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात हैदराबादमध्ये थिएटर आर्टिस्ट म्हणून केली आणि नंतर तो मुंबईला गेला. पुण्यातील FTII मध्ये अभिनयाची औपचारिक पदवी घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याने विविध नोकऱ्या केल्या, या काळात त्यांने विजयने अनेक नाटकांमध्ये अभिनयही केला.

अभिनयाचा आश्वासक चेहरा

नाटकातून आलेली अभिनयाची समज आणि FTII च्या ट्रेनिंगनंतर विजयने अभिनयाच्या आपल्या करिअरमध्ये वेग पकडला. चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये आता विजय वर्मा हा एक आश्वासक चेहरा बनला आहे.थोड्याच पण लक्षात राहिलेल्या चित्रपटांमधुन विजयने आपली दखल घ्यायला प्रेक्षकांना भाग पाडले आहे.

Vijay Varma Career and Struggle
Prabhu Deva : मुलीच्या येण्यानं आनंदी झालेला प्रभू देवा एकेकाळी आपल्या बाळाला गमावून बसला होता

विजय वर्माचे चित्रपट

विजय वर्माने 2008 मध्ये आलेल्या "शोर" या लघुपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने "चितगाव", "रंगरेझ", आणि "गँग ऑफ घोस्ट्स" सारख्या चित्रपटांमध्ये काम केले, परंतु 2016 च्या "पिंक" चित्रपटातील त्याच्या अभिनयामुळे त्याला ओळख मिळाली.

तो "राग देश", "एमसीए", "मंटो", "गली बॉय", "सुपर 30", "बागी 3", आणि "यारा" सारख्या इतर उल्लेखनीय चित्रपटांमध्ये देखील दिसला आहे. 2022 मध्ये, वर्माने "डार्लिंग्स" चित्रपटात आलिया भट्टसोबत मुख्य भूमिका साकारली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com