Mithilesh Chaturvedi: ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन

गुरुवारी सकाळी चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी इंस्टाग्रामवर जाऊन ही दुर्दैवी बातमी शेअर केली.
Mithilesh Chaturvedi
Mithilesh ChaturvediTwitter
Published on
Updated on

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी (Mithilesh Chaturvedi) यांचे निधन झाले. 3 ऑगस्टच्या संध्याकाळी मिथिलेश यांनी जगाचा कायमचा निरोप घेतल्याचे वृत्त आहे. ते हृदयाच्या आजाराशी झुंज देत होते. मिथिलेश यांनी लखनौमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना उपचारासाठी त्यांच्या गावी हलवण्यात आले होते. याला त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर दुजोरा दिला आहे. (Mithilesh Chaturvedi passes away)

Mithilesh Chaturvedi
Johnny Depp: हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप नपुंसकतेचा बळी!

या चित्रपटांमध्ये काम केले

मिथिलेश यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक मोठ्या आणि चांगल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. ते सनी देओलच्या 'गदर: एक प्रेम कथा', मनोज बाजपेयीच्या 'सत्या', शाहरुख खानच्या 'अशोका'सह 'ताल', 'बंटी और बबली', 'क्रिश' आणि 'रेडी'मध्ये दिसले होते. पण 'कोई... मिल गया' या चित्रपटातील त्यांचे काम सर्वाधिक लोकप्रिय ठरले. या चित्रपटात त्याने हृतिक रोशनच्या संगणक शिक्षकाची भूमिका साकारली होती.

Mithilesh Chaturvedi
बॉलिवुडच्या खिलाडीने पुण्यातील 'श्रींमत मिसळ' चा घेतला आस्वाद, Video Viral

मिथिलेश तेच शिक्षक आहे ज्यांनी रोहितला (हृतिक रोशन) त्याच्या वर्गातून बाहेर काढतात आणि त्याच्या वडिलांना संगणक शिकायला सांगतात. हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला कोई मिल गया मधील मिथिलेश चतुर्वेदीची भूमिका आठवते. मिथिलेश चतुर्वेदीला काही काळापूर्वी तल्ली जोडी नावाच्या वेब सीरिजमध्ये काम मिळाल्याचे वृत्त होतं. मिथिलेश यांनी बॉलिवूड चित्रपटांसोबतच थिएटरमध्येही काम केले. रंगभूमीवरील त्यांच्या योगदानाचेही खूप कौतुक झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com