जगभरामध्ये चर्चेत आलेले हॉलिवूडचे अभिनेते जॉनी डेप (Johnny Depp) आणि अम्बर हर्ड () यांच्या मानहानीचा खटला काही संपण्याचे नाव घेत नाही आहे. जॉनी डेपने त्याची माजी पत्नी अम्बर हर्डविरुद्ध दाखल केलेला खटला जिंकला आहे. आणि यानंतर आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. एका आंतरराष्ट्रीय न्यूज पोर्टलनुसार, जॉनी डेप नपुंसकतेचा बळी ठरला आहे. (Hollywood actor Johnny Depp is a victim of impotence)
अबर हर्डच्या वकिलाने हा दावा तेव्हा केला आहे जेव्हा न्यायालयीन कागदपत्रे समोर आली आहेत. जॉनी डेपने वॉशिंग्टन पोस्टच्या 2018 च्या लेखात अम्बर हर्डच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता ज्यामध्ये त्याने स्वत:ला घरगुती अत्याचाराचा बळी म्हणून त्यामध्ये वर्णन केले होते.
वृत्तानुसार, अम्बर हर्ड आणि जॉनी डेप यांच्यातील या कायदेशीर लढाईची 6000 पानांची कागदपत्रे पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आणि ज्यामधून काही धक्कादायक तथ्य समोर आले आहेत. यावरून असे दिसून येते की अंबरच्या गटाने 28 मार्च रोजी न्यायालयासमोर युक्तिवाद केला की आजार हे तिच्या माजी पतीच्या हिंसक वर्तनाचे कारण देखील असू शकते.
जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांनी 2015 मध्ये केले लग्न होते
जरी डेपने त्याच्या नपुंसकतेबद्दल कोणतीही माहिती उघड केलेली नाही, अशी स्थिती लैंगिक हिंसा करण्यास प्रवृत्त करण्याशी देखील संबंधित असू शकते. डेपचा राग आणि अम्बर हर्डवर बलात्कार करण्यासाठी बाटलीचा वापर करणे याबाबत देखील यावेळी हर्ड बोलली.
जॉनी डेप आणि अम्बर हर्ड 2009 मध्ये रम डायरी या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते आणि काही वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांनी 2015 मध्ये लग्न केले तसेच यादरम्यान जॉनी डेपचे फ्रेंच अभिनेत्री व्हेनेसा पॅराडीसशी दीर्घकाळ संबंध होते आणि अम्बर हर्ड फोटोग्राफर व्हॅन रीला डेट करत होते. आपल्या पूर्वीच्या प्रियकरांपासून विभक्त झाल्यानंतर, दोघांनी 2011 पासून गुप्तपणे भेटण्यास सुरुवात केली होती.
2014 मध्ये दोघांनी लग्न केले, एम्बरने तिच्या बोटात एंगेजमेंट रिंग घातलेली असल्याचे चित्र समोर आले तेव्हा ही बातमी सार्वजनिक झाली होती. त्यानंतर बहामासमधील डेपच्या खाजगी बेटावर एका छोट्या समारंभात दोघांनी लग्न केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.