मद्यधुंद अवस्थेत गाडीची धडक दिल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेत्याला सुनावली शिक्षा

अभिनेते दलीप ताहिल यांना एका महिलेला मद्यधुंद अवस्थेत धडक दिल्याबद्दल 2 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
Dilip Tahil
Dilip Tahil Dainik Gomantak
Published on
Updated on

Actor Dalip Tahil sentenced to two months in accident case : शाहरुख खानच्या बाजीगर चित्रपटात मदन चोपडा हे प्रसिद्ध पात्र साकारणाऱ्या दलीप ताहील यांच्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत महिलेला जखमी केल्याप्रकरणी ताहिल यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला आहे. या संदर्भात न्यायालयाने ताहिल यांना 2 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

2018 चे प्रकरण

अपघाताचं हे प्रकरण 5 वर्षांपूर्वीचं आहे. 2018 मध्ये खार येथे एका महिलेला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून ऑटोरिक्षाला धडक दिल्याबद्दल आणि एका महिलेला जखमी केल्याबद्दल दंडाधिकारी न्यायालयाने ज्येष्ठ अभिनेते दलिप तहिल यांना दोषी ठरवले. याशिवाय त्यांना दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

दोषी ठरवले

न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवल्यानुसार 65 वर्षीय अभिनेते दलीप तहिल यांना दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. 2018 मध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत त्याची कार ऑटोरिक्षाला धडकली आणि खार येथे एका महिलेला जखमी केले.

Dilip Tahil
श्रीकृष्णाची भूमीका साकारण्यासाठी अक्षय कुमार तयारच नव्हता...शेवटी ही गोष्ट सांगुन चित्रपटाला हो म्हणाला

अपघातानंतर मद्याचा वास आढळून आल्याचे मत मांडणाऱ्या डॉक्टरांच्या पुराव्याआधारे ताहिल यांना शिक्षा सुनावण्यात आली. दलिप यांच्या चालण्यात अपघातावेळी अडखळेपण जाणवत होते. याशिवाय त्यांचे बोलणे विसंगत होते, अशा अनेक गोष्टी आढळून आल्याने दलिप यांना दोषी ठरवण्यात आलेय.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com