Varsha Usgaonkar Birthday: '57 वर्षे आणि एव्हरग्रीन'! अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे गोव्यात खास बर्थडे सेलिब्रेशन

Varsha Usgaonkar Celebrates 57th Birthday in Goa: वर्षा उसगांवकर सध्या आपल्या गृहराज्यात म्हणजेच गोव्यात आहेत. त्यामुळे त्यांचा हा वाढदिवस आणखी स्पेशल बनला आहे.
Varsha Usgaonkar Birthday
Varsha Usgaonkar BirthdayDainik Gomantak
Published on
Updated on

Marathi Actress Varsha Usgaonkar Celebrates 57th Birthday in Goa Viral Video

Happy Birthday Varsha Usgaonkar:  मराठी चित्रपटसृष्टीतील 'एव्हरग्रीन' अभिनेत्री म्हणून वर्षा उसगांवकर यांचे नाव घेतले जाते. वयाच्या 57व्या वर्षी देखील वर्षा उसगांवकर तितक्याच तरुण आणि उत्साही दिसतात. वर्षा उसगांवकर यांनी आपल्या घाऱ्या डोळ्यांनी, देखण्या चेहऱ्याने अवघ्या मनोरंजन विश्वावर राज्य केले. त्यांनी केवळ मराठी मनोरंजन विश्वच नाही, तर हिंदी चित्रपट सृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आज (28 फेब्रुवारी) अभिनेत्री वर्षा उसगांवकर आपला 57 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, वर्षा उसगांवकर सध्या आपल्या गृहराज्यात म्हणजेच गोव्यात (Goa) आहेत. त्यामुळे त्यांचा हा वाढदिवस आणखी स्पेशल बनला आहे. मराठमोळ्या साजेतील ताईंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हायरल व्हिडिओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. चाहतेही त्यांना वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा देत आहेत.

वर्षाताई अगदी बिंधास्त दिसतायेत

व्हिडिओमध्ये वर्षा उसगांवर गोव्यात आपला वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये चालू असलेल्या गाण्याने वर्षा उसगांवकर यांच्या चाहत्यांना मंत्रमगुग्ध केले आहे. वर्षा उसगांवकर यांनी यावेळी निळी साडी परिधान केली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील निर्मळ हास्य पाहून चाहतेही उल्हासित झाले आहेत. व्हिडिओमध्ये वर्षा उसगांवकर अगदी बिंधास्त दिसत आहेत.

Varsha Usgaonkar Birthday
Varsha Usgaonkar: 'गोंय TB मुक्त करुया'; अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याकडून जनजागृती, पाहा व्हिडिओ

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

चाहते वर्षा ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. एकाने लिहिले की, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर्षामॅडम... तर दुसऱ्याने लिहिले की, जन्म दिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा मराठी सीने अभिनेत्री वर्षा जी उसगांवकर...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com