3 वर्ष चाललेली 'शक्तिमान' मालिका येणार 3 तासांतच

Shaktimaan Is Coming Back: भारतात सुपरहिरो चित्रपटांची वाढती क्रेझ असताना, मोठ्या पडद्यावरचा देसी सुपरहिरो 'शक्तिमान' पुन्हा परतणार आहे.
Shaktimaan Television Show
Shaktimaan Television ShowDainik Gomantak
Published on
Updated on

भारतात सुपरहिरो (Superhero) चित्रपटांची वाढती क्रेझ असताना, मोठ्या पडद्यावरचा देसी सुपरहिरो 'शक्तिमान' पुन्हा परतणार आहे. सोनी पिक्चर्स इंडियाने गुरुवारी जाहीर केले की ते लोकप्रिय सुपरहिरो टीव्ही शो 'शक्तिमान' मधून एक चित्रपट आणणार आहेत.

Shaktimaan Television Show
Karnataka Hijab Row: 'स्वतःला पिंजऱ्यातून मुक्त करायला शिका'

शक्तीमान हा लोकप्रिय टीव्ही शो 1997 ते 2000 पर्यंत डीडी नॅशनलवर चालला होता. यामध्ये अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी एका वृत्तपत्रात सुपरहिरो शक्तीमान आणि फोटोग्राफर पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्रीजी (Pandit Gangadhar Vidyadhar Mayadhar Omkarnath Shastri) यांची भूमिका साकारली होती.

सोनी पिक्चर्स इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक मिनिटाचा घोषणा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये गंगाधरचा चष्मा, कॅमेरा आणि शेवटी शक्तीमानचा पोशाख प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, सोनी पिक्चर्सने दिग्दर्शक आणि कलाकारांबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही ये.

Shaktimaan Television Show
करण ग्रोवर आणि बिपाशा बसू यांच्यात भांडण! या जोडप्याने सांगितले कारण

निर्मात्यांच्या मते, "शक्तिमान" चे शीर्षक "भारतातील एक सुपरस्टार" असणार आहे. खन्ना त्यांच्या भीष्म इंटरनॅशनलच्या माध्यमातून निर्माता म्हणून जोडले गेले आहेत. सोनी पिक्चर्सने ट्विट केले की, भारतात आणि जगभरातील आमच्या अनेक सुपरहिरो चित्रपटांच्या यशानंतर आता आमच्या देसी सुपरहिरोची वेळ आली आहे.

सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन्स 'शक्तिमान' मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी आणि आयकॉनिक सुपरहिरोची जादू पुन्हा निर्माण करण्यासाठी सज्ज आहेत. शक्तीमान टीव्ही शो (Shaktimaan Television Show) डीडी नॅशनलवर सुमारे 450 भाग चालला होता. शक्तीमान टीव्ही शो मुलांमध्ये हा एक अतिशय लोकप्रिय कार्यक्रम होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com